मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Hardeek Joshi : मुख्यमंत्रीही निघाले राणादाचे फॅन ; समोर येताक्षणी पाठीवर दिली कौतुकाची थाप

Hardeek Joshi : मुख्यमंत्रीही निघाले राणादाचे फॅन ; समोर येताक्षणी पाठीवर दिली कौतुकाची थाप

हार्दिक जोशी

हार्दिक जोशी

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे 'राणादा' अर्थातच अभिनेता हार्दिक जोशी घराघरात पोहोचला आहे. आज फक्त सामान्य लोकच नाही तर खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील आपल्या हार्दिकला ओळखतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 04 ऑक्टोबर : 'तुझ्यात जीव रंगला'  या मालिकेमुळे 'राणादा' अर्थातच अभिनेता हार्दिक जोशी  घराघरात पोहोचला आहे. या मालिकेमुळे हार्दिक प्रचंड मिळाली आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. हार्दिकबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्याच्या राणा दा या भूमिकेमुळे त्याचे महाराष्ट्रात चाहते आहेत. या भूमिकेने त्याला विशेष ओळख आणि प्रसिद्धी मिळाली. आज फक्त सामान्य लोकच नाही तर खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील आपल्या हार्दिकला ओळखतात. नुकतंच त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबतचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही  आनंदाची बातमी दिली आहे.

हार्दिक जोशी नुकताच एका खाजगी नवरात्रौत्सवात सहभागी झाला होता. तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी देखील हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी हार्दिकला चांगलं ओळखलं आणि त्याचं  कौतुक देखील केलं. त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मुख्यमंत्री यांनी हार्दिकचा सत्कार देखील केला. हार्दिकने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ''श्री वरदायीनी दुर्गा देवस्थान, ठाणे आयोजित परेशदादा चळके नवरात्र महोत्सवाला भेट दिली. तेथे परेश दादांनी माझी ओळख माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी करून दिली तेंव्हा शिंदे साहेब म्हणाले की अरे! मी तर यांना ओळखतो.हे जेंव्हा ते म्हणाले हे ऐकून मला खूप भरून आलं. ''

हेही वाचा - Adipurush : 'आदिपुरुष'च्या अडचणी वाढल्या; जोरदार ट्रोलिंग नंतर MP च्या मंत्र्यानं केले गंभीर आरोप

पुढे तो म्हणतोय,'' कारण की इतकी मोठी व्यक्ती आपल्याला ओळखते अस म्हणते आणि त्यांचा हातून आपला सत्कार जेंव्हा होतो व पाठीवर जेंव्हा त्यांची थाप पडते तेंव्हा खरोखरच आपण प्रामाणिकपणे जे काम करतोय त्याची पोचपावती आपल्याला मिळते याचा पेक्षा आनंदाचा क्षण काय असेल . हा योग उमेश सुखी हांच्यामुळे घडला त्यांचे आभार..!!''

हार्दिकच्या या  फोटोवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. त्याच्या या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच ओळख दाखवल्यामुळे हार्दिक भावुक झाला. ही गोष्ट अतिशय अभिमानास्पद आहे. त्याच्या कामाची मुख्यमंत्र्यांनी घेतलेली ही  दाखल पाहून चाहते चँगलेच खुश झाले आहेत.

हार्दिक जोशी नुकताच झी मराठीवरील 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेत दिसला होता. ही मालिकासुद्धा फारच लोकप्रिय झाली. आता लवकरच तो अक्षया सोबत 'चतुर चोर' या सिनेमात देखील झळकणार आहे. तसेच आता अक्षया आणि हार्दिक लवकरच लग्नसुद्धा करणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या तयारीला आता सुरुवात झाली असून दिवाळीनंतर ते लग्नबंधनात अडकतील अशी आशा  चाहत्यांना आहे.

First published:

Tags: Marathi cinema, Marathi entertainment