मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Adipurush : 'आदिपुरुष'च्या अडचणी वाढल्या; जोरदार ट्रोलिंग नंतर MP च्या मंत्र्यानं केले गंभीर आरोप

Adipurush : 'आदिपुरुष'च्या अडचणी वाढल्या; जोरदार ट्रोलिंग नंतर MP च्या मंत्र्यानं केले गंभीर आरोप

आदिपुरुष

आदिपुरुष

'आदिपुरुष' चित्रपटाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असताना आता या बहुप्रतीक्षित सिनेमा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पया सिनेमातील रावणाच्या वेषभूषेवरून चित्रपटाला ट्रोल केलं जात आहे. आता त्यानंतर हनुमानाच्या वेषभूषेमुळे भावना दुखावल्याचे आरोप एका खासदाराने केला आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 04 ऑक्टोबर :भारतात बाहुबली अशी ओळख असणारा  प्रभास पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. 'आदिपुरुष' असं या चित्रपटाचं नाव असून हा रामायणावर आधारित असणारा सिनेमा आहे. या चित्रपटांचीही घोषणा झाल्यापासून याबद्दल सर्वत्र चर्चा आहे. आधीच प्रभासचा सिनेमा त्यात रामायणावर आधारित असल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रदर्शनापूर्वीच क्रेझ निर्माण झाली आहे. 'आदिपुरुष' चित्रपटाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असताना आता या  बहुप्रतीक्षित सिनेमा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण टीझर पाहून लोक सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाला ट्रोल  करत आहेत. या सिनेमातील रावणाच्या वेषभूषेवरून चित्रपटाला ट्रोल केलं जात आहे. आता त्यानंतर हनुमानाच्या वेषभूषेमुळे भावना दुखावल्याचे आरोप एका खासदाराने केला आहे.

प्रभास आणि क्रिती सेनन यांच्या 'आदिपुरुष' चित्रपटाच्या टीझरवर सोशल मीडियावर जबरदस्त टीका होत आहे. आता मध्य प्रदेशातूनही निषेधाचा आवाज उठू लागला आहे. शिवराज सिंह चौहान सरकारमधील मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या पात्रांच्या कपड्यांचा त्यांनी निषेध केला आहे. यासोबतच चित्रपटाच्या निर्मात्यांना अशी दृश्ये हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. गृहमंत्री नरोत्तम यांनी 'आदिपुरुष'च्या टीझरबाबत सांगितले की, त्यात आक्षेपार्ह चित्रण करण्यात आले आहे. आपल्या विश्वासाचा केंद्रबिंदू योग्यरित्या चित्रित केलेला नाही. हनुमानजींचे चित्रण चुकीचे दाखवण्यात आले आहे. त्यांच्या कपड्यांचे चित्रण चुकीच्या पद्धतीने केले आहे. मिश्रा म्हणाले की, हनुमान चालिसामध्ये हनुमानजींचे चित्रण स्पष्टपणे सांगितले आहे. त्याचे चित्रण चित्रपटात दाखवलेले नाही. हा आपल्या श्रद्धेवर हल्ला आहे. मी ओम राऊत यांना पत्र लिहित आहे. हा देखावा न काढल्यास कारवाई केली जाईल.

हेही वाचा - Adipurush Teaser :'हा चित्रपट म्हणजे रामायणाचा अपमान'; 'आदिपुरुष'चा टीझर पाहून असं का म्हणतायत प्रेक्षक?

‘आदिपुरुष’ चित्रपटातील रामभक्त हनुमानाच्या वेशभूषेवर मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपटातील हनुमानजींचे कपडे चामड्यासारखे दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे आपल्या श्रद्धेला तडा जातो. चित्रपटाच्या निर्मात्यांनी ती दृश्ये काढून टाकावीत, अन्यथा आम्ही कायदेशीर कारवाई करू, अशी आमची मागणी असल्याचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.‘आदिपुरुष’ चित्रपटातील दृश्ये, त्यातील पात्रे आणि त्यांच्या वेशभूषाबाबत सोमवारपासून निषेधाचे आवाज उठू लागले आहेत. राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनीही विरोध सुरू केला आहे. मध्य प्रदेश सरकारच्या मंत्र्याशिवाय सामाजिक संघटना हिंदू महासभेनेही चित्रपटातील दृश्यांवर आक्षेप नोंदवला आहे. आदिपुरुष चित्रपटात दाखवण्यात आलेल्या दृश्यांविरोधातही संघटनेने आवाज उठवला आहे.

टीझरमधील रावणाच्या पुष्पक विमानाच्या चित्रणालाही नेटिझन्सट्रोल  करत आहेत. काही लोक म्हणाले की या चित्रपटापेक्षा ऍनिमेटेड कार्टून चांगले असतात.  त्याचबरोबर यावेळी चाहत्यांना  रामानंद सागर यांच्या रामायणाची देखील आठवण झाली.या दोघांची तुलना सध्या केली जात आहे. खराब लूक आणि VFX बद्दल तक्रार करत नेटिझन्स पुढे म्हणाले की आदिपुरुष हा रामायणाचा अपमान आहे. “सर @omraut जेव्हा तुम्ही एखाद्या महाकथेला चित्रपटात रूपांतरित करता; प्रत्येक पात्राला मुख्य मुख्य पात्रांप्रमाणेच मूल्यवान समजा. हनुमान जी इतके वाईट का चित्रित केले गेले आहे ? #DisappointingAdipurish," असे ट्विट सध्या ट्रेंड होत आहेत.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment