मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Tunisha Sharma: तुनिषा शर्मानंतर 'ही' अभिनेत्री बनणार नवी 'मरियम'? समोर आलं नाव

Tunisha Sharma: तुनिषा शर्मानंतर 'ही' अभिनेत्री बनणार नवी 'मरियम'? समोर आलं नाव

तुनिषा शर्मा

तुनिषा शर्मा

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर मनोरंजन सृष्टीत खळबळ माजली आहे. अभिनेत्रीने अवघ्या २० व्या वर्षी टोकाचं पाऊल उचलत आपलं संपवल्याने सर्वानांच धक्का बसला आहे. तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर तिची आई वनिता शर्मा यांनी अभिनेता आणि तिचा सहकलाकार बॉयफ्रेंड शिजान खानवर गंभीर आरोप केले होते.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 6 जानेवारी-  टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर मनोरंजन सृष्टीत खळबळ माजली आहे. अभिनेत्रीने अवघ्या २० व्या वर्षी टोकाचं पाऊल उचलत आपलं संपवल्याने सर्वानांच धक्का बसला आहे. तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर तिची आई वनिता शर्मा यांनी अभिनेता आणि तिचा सहकलाकार बॉयफ्रेंड शिजान खानवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. सध्या शिजान तुरुंगात आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे.हे दोन्ही कलाकार 'अलीबाबा: दास्तान-ए-काबुल' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होते. या सर्व प्रकाराने सेटवर गोंधळ माजला आहे.

दोन आठवड्यानंतर सध्या मालिका पूर्वपदावर येण्यासाठी हालचाल सुरु झाली आहे. तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर 'अलीबाबा: दास्तान-ए-काबुल' मध्ये राजकुमारी मरियम कोण बनणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान आता छोट्या पडद्यावरील एका लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे. लेटेस्ट रिपोर्ट्सनुसार या अभिनेत्रीला मरियमच्या भूमिकेसाठी निवडण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. सर्वांनाच जाणून घ्यायचं आहे, ही भिनेत्री नेमकी कोण आहे?

(हे वाचा:Sheezan Khan : शिझानच्या बहिणींनी तुनिषाच्या आईबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाल्या 'त्या जबरदस्तीने... )

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, मरियमच्या भूमिकेसाठी अभिनेत्री अवनीत कौरचं नाव समोर आलं आहे. सध्या सोशल मीडियावर अवनीत कौरची प्रचंड चर्चा होत आहे. 'अलीबाबा: दास्तान-ए-काबुल' मध्ये अवनीत कौर नव्या मरियमच्या भूमिकेत दिसणार असल्याचं काही रिपोर्टसमध्ये सांगण्यात आलं आहे. मात्र मालिकेच्या टीमकडून किंवा अवनीत कडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीय. त्यामुळे प्रेक्षकांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अवनीत कौरबाबत सांगायचं तर, अवनीत आणि तुनिषा शर्मा एकमेकींच्या खास मैत्रिणी होत्या. त्यांचं फारच छान बॉन्डिंग होतं. तुनिषा शर्मा निधनानंतर अवनीत शर्माला अश्रू आवरणं कठीण झालं होतं. अभिनेत्रीची वाईट अवस्था झाली होती. तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अवनीत मालिकेत तुनिषा शर्माची जागा घेते की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणात तिच्या आईने शिजानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नव्हे तर त्यांनी पत्रकार परिषद घेत शिजानला शिक्षा करण्याची मागणी केली आहे. हळूहळू शिजान खानमुळे तुनिषा शर्मा तिच्या आईपासूनही दूर जाऊ लागली.' असा खुलासा तुनिषाच्या आईने केला आहे. शिजानने तिला लग्नाचं वचन दिलं होतं . पण त्यासाठी तो तिच्यावर धर्म बदलण्याची जबरदस्ती करत होता. तसेच त्याच्या बहिणीने तुनिषाला दर्ग्यातही नेले होते.' तुनिषाच्या आईने केलेल्या या दाव्यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे.

First published:

Tags: Entertainment, Tv actors