जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आई कुठे काय करते फेम संजनाला मिळाला नवा प्रोजेक्ट, मालिकेबद्दल घेतला हा निर्णय

आई कुठे काय करते फेम संजनाला मिळाला नवा प्रोजेक्ट, मालिकेबद्दल घेतला हा निर्णय

आई कुठे काय करते फेम संजनाला मिळाला नवा प्रोजेक्ट, मालिकेबद्दल घेतला हा निर्णय

आई कुठे काय करते फेम रूपाली भोसले लवकरच एका नव्या प्रोजक्टमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे हिंदी टीव्ही जगतातील एका लोकप्रिया अभिनेत्यासाोबत ती रोमॅंटिक अंदाजात दिसणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 जानेवारी- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते  (Aai Kuthey Kay Karte ) मालिका आहे. या मालिकेत नकारात्मक भूमिका साकराणारी संजना प्रेक्षकांच्यामध्ये खूपच लोकप्रिय आहे. अभिनेत्री रूपाली भोसली संजनाची भूमिका साकरत आहे. रूपाली भोसले ( rupali bhosale)  सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. रूपाली तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. आता रूपाली लवकरच एका नव्या प्रोजक्टमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे हिंदी टीव्ही जगतातील एका लोकप्रिया अभिनेत्यासाोबत ती दिसणार आहे.  तिच्या फॅन पेजने याबद्दल  माहिती दिली आहे. रूपाली भोसलेच्या फॅन पेजने  काही फोटो शेअर करत तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी माहिती दिली आहे. या पोस्टमध्येम म्हटलं आहे की, ‘तुझसे है राबता’ ( Tujhse Hai Raabta) फेम सेहबान अझीम (Sehban Azim ) आणि रुपाली भोसले ‘जीव झाला मोगरा’ ( Jeev Zala Mogra) या मराठी म्युझिक व्हिडिओसाठी एकत्र आले आहेत. सेहबान झी टीव्हीच्या तुझसे है राबता मधील एसीपी मल्हार राणे यांच्या भूमिकेमुळे घराघरात पोहचला आहे. तर रुपाली संजनाच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. या दोघांना एकत्र पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का?..अशी पोस्ट तिनं केली आहे. यासोबत या फॅन पेजने सेहबान अझीमसोबतचे काही फोटो देखील पोस्ट केले आहेत. चाहत्यांकडून तिच्या या नवी प्रोजेक्टबद्दल तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याशिवाय ती आता आई कुठे काय करतेमध्ये दिसणार का, याचा देखील चाहत्यांना प्रश्न पडला आहे. मात्र रूपाली भोसलेने याबद्दल कोणतीच माहिती शेअर केलेली नाही.

जाहिरात

बिग बॉस मराठीमुळे झळकलेले एक नाव म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले. अनेक मराठी व हिंदी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री रुपाली भोसले ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. नुकताच तिनं तिचा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसाचे काही फोटो व व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर शेअर केले होते. वाचा- मिस्टर & मिसेस मुख्यमंत्री पुन्हा येणार..; सुमी- समर या सिनेमात एकत्र दिसणार रूपाली भोसले साकारत असलेली संजनाची भूमिका नकारात्मक शेडची आहे. मात्र रूपालीने या भूमिकेत तिच्या अभिनयाच्या जीवावर रंग भरला  आहे. या भूमिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. या भूमिकेमुळे तिला वेगळी ओळख मिळाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात