मुंबई, 22 सप्टेंबर: टेलिव्हिजन विश्वात मालिका सर्वाधिक पाहिल्या जात आहेत. मराठी टेलिव्हिजनवर स्टार प्रवाह वाहिनी सध्या टॉप 1वर आहे. मागच्या काही दिवसांपासून वाहिनी सातत्यानं आघाडीवर आहे. टीआरपीच्या शर्यतीतही स्टार प्रवाहच्या मालिका पुढे आहेत. त्यातही ‘रंग माझा वेगळा’, ‘आई कुठे काय करते’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘फुलाला सुगंध मातीचा’ आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिका टॉप 5मध्ये आहे. रंग माझा वेगळा मालिकेनं तर अनेक महिने पहिला क्रमांक सोडलेला नाही. पण या आठवड्यात रंग माझा वेगळा मालिका मागे पडली असून छोटी चिमुरडी स्वरा म्हणजे तुझेच मी गीत गात आहे ही मालिका नंबर वन ठरली आहे. तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या टीमनं मालिकेच्या सक्सेसची माहिती दिली आहे. तुझेच मी गीत गात आहे मालिकेला इतके प्रेम देऊन नंबर 1 वर पोहोचवल्याबद्दल मालिकेच्या संपूर्ण टीमनं प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. मागील आठवड्यात तुझेच मी गीत गात आहे मालिता पाचव्या क्रमांकावर होती. एकाच आठवड्यात मालिकेनं मोठी उडी घेतली आहे. प्रेक्षकांकडूनही मालिकेचं कौतुक करण्यात येत आहे. हेही वाचा - Lagnachi Bedi : राखीला साथ दिल्याची सिंधूला भोगावी लागणार मोठी शिक्षा; मालिकेत मोठा ट्विस्ट मालिकेत सध्या प्रचंड भावुक ट्रॅक सुरू आहे. छोटी चिमुकली म्हणजेच अवनी तायवडे हिनं तिच्या निरागस अभिनयानं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तिचा सहज सुंदर अभिनयानं मालिकेला पहिल्या नंबरवर पोहोचवलं आहे असं म्हणायला हरकत नाही. अभिनेता अभिजीत खांडकेकर, प्रिया मराठे, पल्लवी वैद्य, उर्मिला कोठारे सारख्या कलाकारांची फौज मालिकेत आहेत.
मालिकेत अखेर स्वराज हाच स्वरा असल्याचं सत्य सर्वांसमोर आलं आहे. पण मोनिकाला मात्र स्वराला घरात ठेवायचं नाही. मल्हार आणि स्वरा या बाप लेकीची भेट झाली पण मोनिकामुळे मल्हार स्वरापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतोय. मोनिकामुळे स्वराला प्रचंड त्रास होणार आहे म्हणून मल्हार स्वराजला घराबाहेर निघून जायला सांगतो. स्वराजबरोबर क्षमा काकू देखील घर सोडण्याचा निर्णय घेते.
मालिकेच्या येत्या भागात आपण पाहणार आहोत की स्वराजला घरात परत आणण्यासाठी मोनिका क्षमाचे पाय धरणार आहे. मोनिकाचा खरा चेहरा सर्वांसमोर येणार का? मोनिकाच्या माफी मागितल्यानं स्वराज आणि क्षणा पुन्हा घरी येणार का ये मालिकेच्या येत्या भागात समजणार आहे.