मुंबई, 21 सप्टेंबर : स्टार प्रवाह वरील मालिका ‘लग्नाची बेडी’ चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील सिंधू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सिंधूमध्ये अल्लडपणा आहे पण सोबतच ती बिनधास्त आहे पण ती तितकीच जबाबदारीने वागते. प्रत्येक बाबतीतील तिचा खंबीरपणा, तिची कुठलीही परिस्थिती हाताळण्याची पद्धत प्रेक्षकांना भावते. मालिकेतील राघव आणि सिंधू यांचं लग्न अपघातानेच झालं होतं. पण आता त्यांच्यात हळूहळू मैत्री होत गेली आणि मैत्रीचं आता प्रेमामध्ये रूपांतर झालं आहे. या मालिकेत सध्या सिंधू राखीचं लग्न लावण्यासाठी प्रयत्न करतेय. पण मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे. आता कुठे एकत्र आलेल्या सिंधू आणि राघव मध्ये पुन्हा दुरावा निर्माण होणार आहे. ‘लग्नाची बेडी’ या मालिकेत सध्या सिंधू राखीचं लग्न लावण्यासाठी प्रयत्न करतेय. राखी आणि योगेशला एकमेकांसोबत लग्न करायचं आहे. पण घरच्यांचा या दोघांच्या लग्नाला विरोध आहे. राखी आणि योगेशचं लग्न होऊ नये म्हणून काकूंनी अनेक प्रयत्न केले आहेत. त्यांनी योगेशला किडनॅप सुद्धा केलं होतं. पण सिंधूने त्याला गुंडांच्या तावडीतून सोडवलं. आणि आता ती या दोघांचं लग्न लावून देणार आहे. घरच्यांच्या विरुद्ध जाऊन सिंधू या दोघांचं लग्न लावणार आहे. पण त्याची तिला खूप मोठी शिक्षा भोगावी लागणार आहे. नुकताच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे.
प्रोमोमध्ये सिंधू सगळ्यांपासून लपवून राखी आणि योगेशचं लग्न लावत आहे. तर दुसरीकडे घरी या दोघींची शोधाशोध सुरु झालीये. त्या दोघांचं लग्न लागल्यावर राघव त्याठिकाणी पोहचलाय. पण त्याला सिंधूचा प्रचंड राग येतो. आणि ‘तू माझ्या बहिणीचं लग्न या खोटारड्या माणसाशी लावून दिलं आहेस.’ असं म्हणत तो सिंधूला घराबाहेर काढतो. तिच्या तोंडावर घराचं दार बंद करून राघव ‘हे दार सिंधू सावंत साठी कधीही उघडणार नाही’ असं म्हणतोय. हेही वाचा - Akshaya deodhar : केसात गजरा आणि नेसलेली लुंगी; पाठकबाईंची खास साऊथ इंडियन स्टाईल बॅचलर पार्टी आता कुठे राघव आणि सिंधू एकत्र आले होते. राघवन नुकतीच सिंधूला तिच्यावरील प्रेमाची कबुली दिली होती. पण अचानक आलेल्या या ट्विस्टमुळे आता सिंधू आणि राघव एकमेकांपासून कायमचे दूर होणार असं दिसतंय.
काकू आणि सिंधू मधील छोटी मोठी भांडणं होत होती. मालिकेतील रत्नपारखी कुटुंबातील मोठ्या काकू आणि सिंधू यांच्यात सतत वाद होत असतात. सिंधूला काकू सतत विरोध करत असतात. राघव दोन्ही बाजू सांभाळत घरातील वाद टाळण्याची कसरत करत असतो. पण या प्रसंगांमध्ये राघवसुद्धा तिची साथ देत होता. पण आता येणाऱ्या भागात मालिकेला वेगळं वळण येणार आहे. आतापर्यंत सिंधूच्या बाजूने बोलणारा, तिला साथ देणारा राघवच तिच्याविरुद्ध जाणार आहे. मालिकेत आलेलं हे रंजक वळण प्रेक्षकांना कितपत आवडतंय ते बघणं महत्वाचं ठरेल.