जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Tu Tevha Tashi: पटवर्धनांच्या वाड्यात अनामिकाची एंट्री; पुष्पवल्लीच्या होणाऱ्या जाऊबाईंचा खास उखाणा ऐका

Tu Tevha Tashi: पटवर्धनांच्या वाड्यात अनामिकाची एंट्री; पुष्पवल्लीच्या होणाऱ्या जाऊबाईंचा खास उखाणा ऐका

Tu Tevha Tashi: पटवर्धनांच्या वाड्यात अनामिकाची एंट्री; पुष्पवल्लीच्या होणाऱ्या जाऊबाईंचा खास उखाणा ऐका

तू तेव्हा तशी मालिकेमध्ये येत्या काळात खूप चांगल्या घटना घडताना दिसणार आहेत. मालिकेचा नवा ट्रॅक प्रेक्षकांना भावताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 02 ऑगस्ट: झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत सध्या बरेच चांगले ट्विस्ट आणि टर्न येताना दिसत आहेत. सध्या मालिकेने एक चांगला ट्रॅक पकडला असून बरेचसे काळे ढग हातून सुखाचा पाऊस बरसताना दिसत आहे. येत्या काळात अनामिका आणि सौरभ हे वाड्यात एकत्र राहताना दिसणार आहेत. या निमित्ताने अनामिका पटवर्धनांच्या घरात पाऊल टाकण्याआधी झकास उखाणा घेताना दिसत आहे. झी मराठीच्या नव्या प्रोमोमध्ये अनामिकाच स्वागत करायला सगळे पटवर्धन कुटुंबीय दिसत असून यामध्ये खास पुष्पवल्लीच्या आग्रहास्तव अनामिका उखाणा घेताना दिसत आहे. “सगळ्यांनी केला आग्रह की लग्नाआधी एकत्र राहू. नात्याला नाव देण्याआधी मनाने तर एकत्र येऊ. उशिरा का होईना नव्याने सुरुवात करून पाहू. पटवर्धनांच्या वाड्यात पाऊल ठेवते पुष्पवल्लीची जाऊ.” असा धमाकेदार उखाणा घेत अनामिका पटवर्धन वाड्यात पाऊल ठेवताना दिसत आहे. लग्नाआधी अनामिका आणि सौरभ हे एकमेकांना समजून घेण्यासाठी एकत्र राहताना दिसणार आहेत. त्यांचं हे नातं कावेरी आईला पटत नसलं तरी अनामिकाने आता स्वतःला काय वाटतं याचा विचार करत तिच्या मतावर ठाम राहायचं ठरवलं आहे. अनामिका आणि सौरभ यांचं लवकरच लग्न सुद्धा पार पडेल असे संकेत मिळत आहेत पण त्याआधी एकमेकांना नीट समजून घेण्यासाठी मनाने एकत्र येण्यासाठी दोघेही एकाच वाड्यात राहताना दिसणार आहेत.

जाहिरात

मालिकेत नुकतच एक नवं गाणं सुद्धा येऊन गेलं ज्यामध्ये जाऊबाई आणि वहिनींमधला एक खट्याळ संवाद समोर आला होता. मालिकेच्या एक तासाच्या विशेष भागात अनामिका आणि सौरभ सहकुटुंब गाण्यावर थिरकताना दिसले होते. हे ही वाचा-  Sonali Kulkarni: मराठी गाणं गाऊन मायलेक साजरी करतायेत नागपंचमी; सोनालीला झाली ‘या’ दिग्दर्शिकेची आठवण येत्या काळात मालिकेत अशा अनेक गष्टी घडणार आहेत ज्याची कल्पना प्रेक्षकांनी केली नसेल. असा संकेत स्वतः स्वप्नील जोशीने एका मुलाखतीत दिला होता. आता सौरभ आणि अनामिका यांच्यातलं हे प्रेम कसं फुलतं हे पाहायची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असल्याचं दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात