मुंबई 02 ऑगस्ट: मराठी संस्कृतीत नागपंचमी या सणाचं महत्त्व बरंच आहे. नागाला कायमच माणसाचा मित्र मानण्यात आलं असून त्याच्या पूजेचा हा दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या नागपंचमीच्या निमित्ताने सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री मराठी संस्कृतीतील काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी करताना दिसून येत आहे. यासंबंधी तिने शेअर केलेला व्हिडिओ सुद्धा खूप पसंत केला जात आहे. नागपंचमीच्या दिवशी मुली आवर्जून हातावर मेहंदी काढतात आणि झोके बांधून झुलायचा आनंद सुद्धा घेतात असं सांगितलं जातं. आपल्या लेकीला हे संस्कार देण्याचं काम सध्या सोनाली करताना दिसत आहे. आपल्या मुलीच्या हातात बांगड्या भरून तिला झुल्यावर बसवताना आणि दोघीही आनंद घेताना दिसून येत आहेत. तसंच (sonali kulkarni daughter) सोनाली तिच्या ‘दोघी’ सिनेमातील एक गाणं सुद्धा गाताना दिसत आहे. या निमित्ताने तिने सुमित्रा भावे या दिग्दर्शिकेची आठवण काढून त्यांचा उल्लेख सुद्धा पोस्टमध्ये केला आहे. ती असं लिहिते, “आज नागपंचमी.. दोघी ची आठवण तुम्ही कुठे गेलात सुमित्रामावशी . आज नागपंचमी. श्रावणातील पाचवा दिवस. आजच्या दिवशी साप आणि नाग यांचं मोठं महत्त्व आहे. मराठी संस्कृतीमध्येनागांना कायमच माणसाचा भाऊ म्हणून संबोधलं जातं जेणेकरून ते कधी आपल्या कुटुंबाला हानी पोहोचवणार नाहीत. हे ही वाचा- Kshitee Jog: रॉकी और रानी की प्रेमकहानीमध्ये दिसणार क्षिती; Wrap पार्टीला रणवीरने मारली जोरदार मिठी आजचा दिवस हा निसर्गाशी वेगळंच नातं सांगणारा म्हणून ओळखला जातो. स्त्रिया हातावर मेहंदी काढून झुले बांधून गाणी म्हणताना दिसून येतात. हे माझ्या ‘दोघी’ चित्रपटातील गाणं आहे. माझ्या मुलीला हे गाणं शिकवताना फार भावनिक झाले आहे.”
सोनाली आपल्या लेकीला गाणं शिकवता शिकवता तिच्यासोबत आनंद लुटताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी सुद्धा बराच प्रतिसाद दिला असून आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा हा उत्तम मार्ग आहे अशी प्रतिक्रिया समोर येत आहे.