मुंबई, 27 नोव्हेंबर : झी मराठीवरील गाजलेली मालिका म्हणजे 'तुझ्यात जीव रंगला'. ही मालिका इतकी लोकप्रिय झाली की मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात घर बनवलं. मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीने तर सगळ्यांचीच मने जिंकली. राणा दा, पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे रील लाईफ कपल आता रीअल लाईफमध्येही एकमेकांशी लग्न करणार आहेत. दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाविषयीची नवनवीन अपडेट ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच अभिनेता हार्दिक जोशीने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक नवा फोटो शेअर केला आहे.
अभिनेता हार्दिक जोशीने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो हार्दिकच्या घरच्या केळवणाचा आहे. फोटोमध्ये हार्दिक मस्त तयार होऊन सोफ्यावर बसलेला दिसत आहे. त्याच्यासमोर सुंदर सजवलेलं केळवणाचं ताट आहे. हार्दिकने फोटो शेअर करताच काही क्षणातच हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकजण पोस्टवर कमेंट करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
'झोपेतून उठल्यासारखा का दिसतोय, अजून केळवण चालू आहे लग्न कधी, हार्दिक लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा, लग्न कधी आहे राणा दा, राणा दा लई भारी, लग्न कधी आहे राणा ?, लग्नाची तारीख किती रानादा, राणा फारच छान सुंदर! तुला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा', अशा अनेक कमेंट चाहते हार्दिकच्या पोस्टवर करत आहेत.
दरम्यान, अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघेही सातत्याने चर्चेत असतात. लवकरच ते दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या त्या दोघांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील हिट ठरलेल्या जोडीने साखरपुडा करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. लाडका राणादा आणि अंजलीबाईं लग्न करणार म्हटल्यावर चाहत्यांच्या आनंदाची सीमाच उरली नाही. कधी एकदा दोघे लग्न करतायेत असं चाहत्यांना झालंय. प्रत्येक पोस्टवर चाहते लग्नाविषयीच विचारताना दिसतायेत. त्यामुळे हे बहुप्रतिक्षित लग्नसोहळा कधी पार पडणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Marathi news