Home /News /entertainment /

Tu Tevha Tashi: अनामिकाच्या आईचं अस्खलित हिंदी ऐकलंत का? हसून हसून डोळ्यात येईल पाणी!

Tu Tevha Tashi: अनामिकाच्या आईचं अस्खलित हिंदी ऐकलंत का? हसून हसून डोळ्यात येईल पाणी!

तू तेव्हा तशी (Tu Tevha Tashi) मालिकेतील एक जेष्ठ अभिनेत्री एवढं सुंदर आणि अस्खलित हिंदी बोलत आहेत याची तुम्हाला कल्पना आहे का?

  मुंबई 22 जून: (Zee Marathi) झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) मालिकेची क्रेझ सध्या बरीच असल्याचं समजत आहे. अगदी कमी काळात या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेची कमाल स्टारकास्ट आणि मालिकेचं कथानक यामुळे ही मालिका सगळ्यांनाच आवडते. या मालिकेतल्या एका पात्राचं हिंदी ऐकून तुम्हालाही घाम फुटेल बरं का! या मालिकेत पट्या म्हणजे (Swapnil Joshi) स्वप्नील जोशी आणि अनामिका म्हणजे (Shilpa Tulaskar) शिल्पा तुळसकर यांची एक कमाल आणि गोड लव्हस्टोरी पाहायला मिळत आहे. याशिवाय जेष्ठ अभिनेत्री (Suhas Joshi) सुहास जोशी, (Ujwala Jog) उज्वला जोग, (Abhidnya Bhave) अभिज्ञा भावे असे कलाकार सुद्धा या मालिकेत आहेत. मालिकेत अनामिकाची आई असणाऱ्या सुहास जोशींचा एक विडिओ सध्या बराच प्रसिद्ध होताना दिसत आहे. पट्या रूप बदलून अनामिकाला भेटायला लॉंड्रीवाला भैय्या बनून येतो असा एक प्रसंग दाखवला आहे. त्यानंतर त्याच्याशी भन्नाट हिंदीत बोलतानाचा एक विडिओ झी मराठीच्या सोशल मीडियावरून प्रसिद्ध झाला होता. तसाच अजून एक विडिओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. यात सुहास जोशी या एकदम कडक स्टाईल मध्ये मराठी मिश्रित हिंदी बोलताना दिसत आहेत. त्यांचं हे हिंदी ऐकून तुम्हाला हसून हसून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ‘इधर सब बायका बायका ही रहते है यहा पुरषो का कपडा कसा आया’ असं सांगत सुहास या हिंदीत बोलताना दिसतात. त्यांचं हे अस्खलित हिंदी ऐकलंत तर तुम्हाला सुद्धा चक्कर आल्यासारखं होईल आणि तुम्हीही नक्कीच चक्रावून जाल हे मात्र खरं.
  प्रेमाला वय नसतं हे सांगणारी ही गोड मालिका सध्या सुंदर ट्रॅक वर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होत आहे. सुहास जोशींच्या भूमिकेव्यतिरिक्त यातली वल्ली, राधा आणि इतर अनेक छोटी मोठी सगळीच पात्र खूप भाव खाऊन जाताना दिसत आहेत. हे ही वाचा- तू हसतेस तेव्हा... गायक राहूल देशपांडेची बायकोसाठी खास रोमँटिक पोस्ट या मालिकेच्या निमित्ताने अनेक दिवसांनी शिल्पा आणि स्वप्नील या दोघांनीही मालिका क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सध्या या मालिकेत अनामिकाला हळूहळू पट्याबद्दल प्रेम निर्माण होताना दिसत आहे. पण अनामिकाच्या कावेरी आईमुळे अनेक संकटं ओढवली जाणार हा=अशीही चिन्ह आहेत. आता या सगळ्या गोंधळात पट्याला अनामिका मिळणार का आणि त्यांच्या या प्रेमाला घरच्यांची मान्यता मिळणार का हे पाहून येत्या काळात महत्त्वाचं असेल.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या