मुंबई, 2 ऑगस्ट: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री अभिज्ञा भावे नेहमीच चर्चेत असते. अभिज्ञा भावे सध्या तू तेव्हा तशी या मालिकेत खलनायिकेचं पात्र वठवतेय. ती या मालिकेत ‘पुष्पवल्ली’ ही भूमिका साकारत आहे. मालिकेमधील वल्ली अनेकदा लबाडी, कपटीपणा करताना दिसते, फटकळ बोलते. हि वल्ली कायम सौरभला त्रास देते, कोणत्याही गोष्टीचा नुसता गोंधळ घालते. सौरभ आणि अनामिकाच्या नात्यात खोड घालण्याचं काम वल्ली करते. या वल्लीचा स्वभावच हा असा आहे. त्याला काही औषध नाही. अभिज्ञा साकारत असलेल्या वल्लीवर लोक कितीही वैतागले, तरीही अभिज्ञाची भूमिका चाहत्यांना खूप आवडते. तू तेव्हा तशी मालिकेतील सर्वच भूमिका लोकप्रिय झाल्या. प्रेक्षकांना या व्यक्तिरेखा पाहायला आवडतात. पण एक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या डोक्यात जाते ती म्हणजे या मालिकेतील ‘वल्ली’. ती कायम काही ना काही कुटाने करत असते. सौरभ अनामिकाच नातं तोडायचा प्रयत्न करते. पण या वल्लीला दिवशी चाहत्यांनी चक्क नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल ना कि वल्लीचा आणि नागपंचमीचा संबंध काय? तर त्याच उत्तरही जाणून घ्या.
तू तेव्हा तशी मालिकेत वल्लीच्या एंट्रीचा डायलॉग ऐकलंय का तुम्ही. तो आहे ‘पुष्पवल्ली नाव ऐकून नाजूक वेल समजलात का? नागीण आहे मी!’. हेही वाचा - Virajas kulkarni : कोण होतास तू, काय झालास तू; ‘माझा होशील ना’ मालिकेआधी विराजस दिसायचा असा या तिच्या डायलॉगमुळे चाहत्यांनी तिला चक्क नागपंचमीच्याच शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे चाहते काय करतील हे सांगता येणार नाही. पण अभिज्ञा भावेने हि वल्लीची भूमिका खूपच उत्तमरीत्या साकारली आहे. हि वल्ली तुमच्या आमच्यातीलच एक वाटते. या वल्लीच्या भूमिकेत अभिज्ञा अगदी समरस झाली आहे. म्हणूनच खलनायिका असली तरी वल्ली प्रचंड लोकप्रिय आहे. मालिकेत सध्या सौरभ आणि अनामिकाच्या प्रेमाला भर आला आहे. लवकरच हे दोघे लग्न करणार आहेत. पण त्यातही वल्ली आणि कावेरी म्हणजेच अनामिकाची आई खोड घालत आहेत. त्यामुळे सहजासहजी सौरभ आणि अनामिकाचं लग्न होणार नाही. मालिकेत आता एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होत. या गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.