जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Virajas kulkarni : कोण होतास तू, काय झालास तू; 'माझा होशील ना' मालिकेआधी विराजस दिसायचा असा

Virajas kulkarni : कोण होतास तू, काय झालास तू; 'माझा होशील ना' मालिकेआधी विराजस दिसायचा असा

Virajas Kulkarni

Virajas Kulkarni

‘माझा होशील ना’ हि मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील आदित्यची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विराजस कुलकर्णीने त्याची लूक टेस्ट कशी झाली त्याचा किस्सा शेअर केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 जुलै : झी मराठीवरील  ‘माझा होशील ना’ या मालिकेमधून पदार्पण केलेला  प्रसिद्ध अभिनेता विराजस कुलकर्णी काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो.  अभिनयाच्या जोरावर त्यानं त्याचा वेगळा  चाहता वर्ग निर्माण केला आहे. विराजस सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो आणि वेगवेगळे फोटो शेअर करत असतो. पण त्याच्या फोटोंपेक्षा त्याने टाकलेल्या कॅप्शनचीच  जास्त चर्चा होते. विराजस त्याच्या फोटोना हटके आणि भन्नाट कॅप्शन टाकत असतो. चाहत्यांना त्याचे हे कॅप्शन प्रचंड आवडतात.   नुकताच विराजसनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली पहायला मिळतेय. विराजसची मालिका ‘माझा होशील ना’ संपून एक वर्ष पूर्ण  झालं आहे. मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला होता. त्यानिमित्ताने त्याने ‘आता महिनाभर तुम्हाला माझा होशील ना मालिकेच्या शूटिंग दरम्यानचे फोटो आणि BTS  व्हिडीओ पाहायला आवडतील का हा प्रश्न विचारला होता. त्याला चाहत्यांकडून होकार मिळाला. म्हणून आता  विराजसने त्याच्या या मालिकेतील लूकची गोष्ट चाहत्यांसोबत  शेअर  केली आहे. विराजसपासून आदित्य देसाई बनण्यापर्यंतचा  प्रवास कसा होता हे सांगण्यासाठी वेगवेगळ्या लूकमधील तीन फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात

या पोस्टच्या पहिल्या फोटोमध्ये त्याचे केस आणि दाढी वाढलेली दिसतेय जी दुसऱ्या एका भूमिकेची गरज होती. म्हणून त्याने केस वाढवले होते. पण माझा होशील ना साठी विचारण्यात आल्यावर त्याने त्याच्या लूक बदलला. वाढलेले केस आणि दाढी कमी केली. हेही वाचा - Tu Tevha Tashi : स्वप्निल जोशीनं सांगितलं अभिज्ञा भावेचं ‘ते’ गुपित तो म्हणतोय, ‘मी जंगली दिसत नाहीये याचा पुरावा म्हणून मी निर्मात्यांना माझा हा फोटो पाठवला. आणि सगळ्यात शेवटी आदित्य देसाईंच्या भूमिकेसाठी त्याचं  फोटोशूट केलं गेलं तो फोटो शेअर केला आहे. हे त्याच्या आयुष्यातील सगळ्यात पाहिलं फोटोशूट होतं  असंही  त्याने म्हटलं आहे. विराजसकडून  आता माझा होशील ना मालिकेतील वेगवेगळे  फोटो आणि व्हिडीओ आणि त्यामागचे किस्से  चाहत्यांना ऐकायला मिळतील. हि मालिका प्रचंड लोप्रिय झाली होती. आदित्य आणि सई हि जोडी खूपच लोकप्रिय झाली होती. अजूनहि सोशल मीडियावर सई आदित्य यांचे फॅनक्लब आहेत. आता विराजस शेअर करणाऱ्या  फोटो म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात