मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Tu Jhoothi Main Makkaar Trailer: ट्रेलरमध्येच रणबीर आणि श्रद्धाचे एक सो एक किसिंग सीन्स; चाहते म्हणाले, 'सिनेमात तर...'

Tu Jhoothi Main Makkaar Trailer: ट्रेलरमध्येच रणबीर आणि श्रद्धाचे एक सो एक किसिंग सीन्स; चाहते म्हणाले, 'सिनेमात तर...'

तू झुठी मै मक्कार

तू झुठी मै मक्कार

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर आगामी चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. 'तू झुठी मै मक्कार' असं या चित्रपटाचं नाव असून याचा ट्रेलर समोर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 जानेवारी :  बॉलिवूडसाठी मागचं वर्ष फारसं फलदायी ठरलं नाही. अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. पण येणाऱ्या वर्षात काही दमदार सिनेमे बॉक्स ऑफिसवर येणार आहेत. त्यामुळे येणारं वर्ष बॉलीवूडला तारेल अशी सगळ्यांनाच अपेक्षा आहे. या वर्षाची सुरुवात शाहरुख, दीपिका आणि जॉनच्या 'पठाण' चित्रपटाने होणार आहे. त्याची सगळीकडेच चर्चा आहे. पण आता त्यात अजून एका चित्रपटाची भर पडणार आहे. रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला आहे.

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर आगामी चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. दोघेही पहिल्यांदाच सोबत काम करणार आहेत. त्यामुळे रणबीर आणि श्रद्धाचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या चर्चा पहायला मिळत आहे. या चिपटाचं नाव नेमकं काय असणार यावरुनही अनेक चर्चा रंगलेल्या पहायला मिळाल्या. 'तू झुठी मै मक्कार' असं या चित्रपटाचं नाव असून याचा ट्रेलर समोर आला आहे.

हेही वाचा - Pathaan: पुण्यात 'पठाण' चित्रपटावरून पेटला वाद; बजरंग दलाकडून झाली 'ही' कारवाई

चित्रपटाचा ट्रेलर खूपच मजेदार दिसत आहे. रणबीर आणि श्रद्धा दोघेही आपापल्या व्यक्तिरेखेत शोभून दिसत आहेत. दोघांची मस्त स्टाइल चित्रपटाला वेगळ्या धाटणीचा बनवत आहे. त्याच वेळी, चित्रपटात एक सरप्राईज घटक देखील आहे आणि तो म्हणजे बोनी कपूर. चित्रपट निर्माते बोनी या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

" isDesktop="true" id="818991" >

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरसाठी हा चित्रपट अनेक अर्थांनी खास आहे. हे दोघे पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हे दोन्ही कलाकार एकमेकांना लहानपणापासून ओळखत असले तरी. दोघांमध्ये चांगली बाँडिंग आहे, जी ट्रेलरमध्येही दिसते. त्यांचे वडील ऋषी आणि शक्ती कपूर या दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अशा परिस्थितीत या स्टार किड्सना एकत्र पाहणे चाहत्यांसाठी खास असेल. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना किती आवडते आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो हे पाहणं खूपच उत्कंठावर्धक ठरणार आहे.

राहुल मोदी आणि लव रंजन यांनी हा चित्रपट लिहिला आहे. याआधी लवने 'प्यार का पंचनामा' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' हे चित्रपट आणले आहेत. अशा परिस्थितीत या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटात डिंपल कपाडियाही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor, Shraddha kapoor