जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Tu chal pudha : नवरा बायकोचं प्रेम पुन्हा बहरणार; अश्विनी श्रेयसला प्रेमाची कबुली देणार; एपिसोड अपडेट पाहा

Tu chal pudha : नवरा बायकोचं प्रेम पुन्हा बहरणार; अश्विनी श्रेयसला प्रेमाची कबुली देणार; एपिसोड अपडेट पाहा

तू चाल पुढं

तू चाल पुढं

श्रेयस आणि अश्विनीचे रोमँटिक क्षण मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. जाणून घ्या काय घडणार आगामी भागात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 05 ऑक्टोबर :  झी मराठीवरील  ‘तू चाल पुढं’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील अश्विनीची गोष्ट प्रेक्षकांना चांगलीच भावते आहे. तुमच्या आमच्यातली सामान्य गृहिणी आपल्या कुटुंबाला कशी आधार देते हे बघायला प्रेक्षकांना आवडतं.  ‘तू चाल पुढं’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात बाजी मारली आहे. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणारी, कुटुंब साभांळणारी आणि वेळी नवऱ्याला आपल्या बाजूनं कसं मनवायचं हे उत्तमरित्या माहिती असणारी अश्विनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीच्या पसंतीस उतरली आहे. अश्विनी पतीला पाठींबा देते पण वेळ आली तर त्याच्या चुकाही दाखवून देते. पण यामुळे तिने विशेष करून महिला प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. आता मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये अश्विनी आणि श्रेयसचे खास क्षण पाहायला मिळणार आहेत. अश्विनी आणि श्रेयसमध्ये काही काळापासून नाराजी होती. अश्विनी जरी त्याला सतत पाठींबा देत असली तरी श्रेयस मात्र नेहमी तिला कमी लेखतो. तिला वाईट बोलतो. हे अश्विनीला सुद्धा आवडत नाही. ती वेळोवेळी त्याला सुनावत असते, त्याची चूक दाखवून देण्याचा प्रयत्न करते. पण आता श्रेयसला त्याची चूक लक्षात येणार असं नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून लक्षात येतंय. नवीन प्रोमोनुसार, अश्विनी आणि श्रेयसच्या रोमँटिक क्षण आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहेत. ते दोघे चक्क डेटवर जाणार आहेत. हेही वाचा - Kushal badrike : श्रेया बुगडे बहुतेक ‘हॅरी पॉटरच्या’ शाळेत शिकलीय; असं का म्हणतोय कुशल बद्रिके? अश्विनीची मुलगी श्रेयसला, ‘आईला डेटवर घेऊन जा’ असं सुचवते. तीच ऐकून तो अश्विनीला लंच  डेटवर घेऊन जाणार आहे. अश्विनी छान  आवरून श्रेयससोबत जाणार आहे. श्रेयसने एवढी छान  वागणूक दिलेली पाहून अश्विनी खूपच आनंदी दिसत आहे. पण तिचा हा आनंद  किती काळ टिकणार, श्रेयसला खरंच त्याच्या चुकीची जाणीव झालीये का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

जाहिरात

दरम्यान, आज मालिकेचा दसरा विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या भागामध्ये अश्विनी रावण दहन करणार आहे. पण याच मुहूर्तावर ती श्रेयसला त्याची चूक दाखवून देणार आहे. आता हीच चूक उमगून श्रेयसला अश्विनीचं त्याच्या आयुष्यातील महत्व पटलंय का हे आगामी भागामध्ये दिसणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अश्विनी आणि श्रेयस यांना कुटुंबासाठी नवं घर घ्यायचं आहे. राहणीमान उंचवायचं आहे. श्रेयस अनेकांना घरासाठी कर्ज मिळवून देणाऱ्या कंपनीत नोकरी करायचा पण तेच काम स्वतंत्रपणे करण्याचं ठरवून त्याने बिझनेस सुरू केला आहे. अश्विनीनेच त्याच्या ऑफिससाठी एक जागाही शोधून काढली. अश्विनी श्रेयसकडे तिलाच असिस्टंट म्हणून ठेवण्याची मागणी करते. मात्र श्रेयस तिचा अपमान करतो. आता ती याला त्याच्या चुकीची जाणीव आगामी भागांमध्ये करून देणार आहे. त्याचप्रमाणे या दोघांचे रोमँटिक क्षण देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात