मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kushal badrike : श्रेया बुगडे बहुतेक 'हॅरी पॉटरच्या' शाळेत शिकलीय; असं का म्हणतोय कुशल बद्रिके?

Kushal badrike : श्रेया बुगडे बहुतेक 'हॅरी पॉटरच्या' शाळेत शिकलीय; असं का म्हणतोय कुशल बद्रिके?

श्रेया बुगडे -  कुशल बद्रिके

श्रेया बुगडे - कुशल बद्रिके

श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके यांची मैत्री सगळ्यांनाच माहिती आहे. नुकतीच कुशलने भन्नाट पोस्ट केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 05 ऑक्टोबर : गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांनी  घराघरात लोकप्रियता मिळवली आहे. या कार्यक्रमामुळे प्रसिद्धी झोतात आलेला  अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. एरवी तो प्रेक्षकांना खळखळून हसवतो. पण हल्ली त्याच्या कॅप्शनमुळे तो चाहत्यांची मन जिंकून घेत आहे. त्याने त्याच्यातील लेखकाला चाहत्यांसमोर आणलाय. आणि त्याची ही  बाजू सुद्धा प्रेक्षकांना आनंदच देत आहे. नुकतंच कुशलने चला हवा येऊ द्या मधील त्याची सहकलाकार आणि अभिनेत्री श्रेया बुगडेबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने वेगळ्या ढंगात श्रेयाचं  कौतुक केलं आहे.

श्रेया आणि कुशलची मैत्री आजवर सगळ्यांना माहिती झाली आहेच. हे दोघे ऑनस्क्रीन प्रेक्षकांना हसवतात, पण ऑनस्क्रीनसुद्धा त्यांचं बॉण्डिंग खास आहे. हे दोघे दमदार अभिनय करतात. जी व्यक्तिरेखा साकारायची आहे त्याची कॉपी करत पण स्वतःचं  वेगळेपण जपत ती व्यक्तिरेखा साकरण्याचं कसब  दोघांकडे आहे. आता याच गोष्टीवर कुशल श्रेयाचा कौतुक करतोय. त्याने श्रेयासोबतचा फोटोपोस्ट करत लिहिलंय कि, ''कधी कधी मला वाटतं की “श्रेया बुगडे” ही “हॅरी पॉटरच्या” शाळेत शिकून आली असेल, काहीतरी मंत्र पुटपुटून काडी फिरवली की, ही हवं ते रूप घेऊ शकत असेल बहुतेक.परवाच्या स्किटमद्धे तिला “श्रीवल्लीची” भुमिका होती ज्यात तिला “मुक्ता बर्वे” साकारायची होती, शेवटच्या रीडिंगला ती मुक्ता बर्वेच्या आवाजात बोलू लागली, मग स्टेजवर गेली तर “श्रेया” आणि “मुक्ता” असा द्विपात्री प्रयोग चालू आहे की काय असा भास होऊ लागला.''

हेही वाचा - Sankarshan Karhade : 'गावाकडंची एस. टि. दिसली तरी'... दसऱ्यादिवशी संकर्षणला वाटतीये 'या' गोष्टीची खंत

पुढे तीचं  कौतुक करत तो म्हणतोय कि, ”श्रेया बुगडे” म्हणून स्वतःच वेगळं अस्तित्व जपून, तिला “उषा नाडकर्णी, शुभांगी गोखले, कंगना, श्रीदेवी, वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे वीज, सई ताम्हणकर आणि अशा अनेक….म्हणजे तिला हवी ती रुपं घेता येतात !! ती काय जादू शिवाय? मला पक्की खात्री आहे की ती “HOGWARTS” मधून शिकून आली आहे, आणि तिचे बाबा “ Dumbledore”आहेत. “आबरा का डाबरा, हवा येऊ द्या पहात रहा” अशा  शब्दात त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.

कुशलने श्रेयासाठी लिहिलेली ही  पोस्ट चाहत्यांना देखील भावली आहे. त्यांनी सुद्धा कमेंट करत श्रेयाचं  कौतुक केलं आहे. दरम्यान श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके हे दोघेही कायमच एकमेकांची मजा-मस्ती करत असतात. ते दोघेही सोशल मीडियावर चांगले सक्रिय असतातमध्यंतरी श्रेयाने कुशलसाठी केलेली पोस्टदेखील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.

First published:

Tags: Marathi entertainment