जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Tu Chal Pudha : अखेर अश्विनी दाखवणार शिल्पीला इंगा; नणंद भावजईंमध्ये तुफान राडा

Tu Chal Pudha : अखेर अश्विनी दाखवणार शिल्पीला इंगा; नणंद भावजईंमध्ये तुफान राडा

तू चाल पुढं

तू चाल पुढं

इतके दिवस शिल्पीचं सगळं ऐकून घेणारी अश्विनी यावेळी मात्र शिल्पीला चांगलाच इंगा दाखवणार आहे. मालिकेचा एपिसोड अपडेट लगेच पाहा.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,  31 डिसेंबर : झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अश्विनी वाघमारे आणि तिच्या कुटुंबाचा प्रवास मालिकेतून दाखवण्यात आला आहे. मालिकेत सध्या अश्विनीनं घरातील सगळ्यांचा विरोध पत्करून मोठ्या हिंमतीनं तिचं ब्युटी पार्लर सुरू केलं आहे. मात्र तिच्या प्रत्येक गोष्टींमध्ये अडचण आणणाऱ्या शिल्पनं यावेळी देखील नवीन संकट आणलं. अश्विनीचं ब्युटी पार्लर सुरू झालं मात्र त्यात शिल्पीमुळे त्यात मोठा अडथळा आला. पण यावेळी मात्र शिल्पीची खेळी अश्विनीच्या लक्षात येणार आहे. इतके दिवस शिल्पीचं सगळं ऐकून  घेणारी अश्विनी यावेळी मात्र शिल्पीला चांगलाच इंगा दाखवणार आहे. मालिकेच्या पुढच्या भागात काय घडणार पाहूयात. तू चाल पुढं मालिकेत आतापर्यंत आपण पाहिलं की, अश्विनी तिचं ब्युटी पार्लर सुरू करते. पार्लरच्या उद्घाटनासाठी ती सगळ्यांना बोलावते पण त्यावेळी लायसन्स देणारा माणूस येतो आणि हे पार्लर नसून युनिसेक्स सलोन असल्याचं सांगतो. अश्विनीच्या सलोनमध्ये महिला आणि पुरूष दोन्ही येणार हे ऐकून श्रेयस आणि शिल्पी अश्विनीवर भडकतात. हे सगळं श्रेयसनं केलं असं अश्विनी आणि बबन यांना वाटतं पण यामागे आता शिल्पीचा हात असल्याचं अश्विनीला कळणार आहे. हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte:अरुंधतीच्या आयुष्यात येणार नवं वादळ; आशुतोष अनुष्काच एकमेकांना देणार प्रेमाची कबुली? अश्विनी बाहेर जात असताना तिला शिल्पी लायसन ऑफिसरशी बोलताना दिसते. तिला संशय येतो आणि तिचा संशय खरा ठरतो. त्यानंतर मात्र अश्विनीचा पारा चढतो आणि ती तिच्या स्टाईलनं शिल्पीला तिचं खरं रूप दाखवते.

जाहिरात

मालिकेच्या येत्या भागांचा एक प्रोमो समोर आला आहे ज्यात अश्विनी शिल्पीचा हात धरून जोरात पिरगळते आणि तिला जाब विचारत म्हणते, ‘माझ्या पार्लरचं लायसन तूच बदललंस ना? खरं बोल?’ त्यावर शिल्पी तिची चूक मान्य करत हो म्हणते. ‘मग आता चूक केलीये ना ती सुधारायची नाहीतर तुझा हात परत पिरगळेन’, असं शिल्पीला चांगलेच खडेबोल सुनावते. त्याचप्रमाणे अश्विनीच्या पार्लरमध्ये ती शिल्पीला शिक्षा म्हणून स्पेशल ऑफर देखील देणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

आता ती शिक्षा काय असणार? तसंच शिल्पीनं केलेली चूक अश्विनी घरच्यांसमोर आणणार का? हे प्रेक्षकांना येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात