मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /नव्या नवेलीला डेट करतोय मीजान? जावेद जाफरींनी दिलं उत्तर

नव्या नवेलीला डेट करतोय मीजान? जावेद जाफरींनी दिलं उत्तर

गेल्या काही दिवसांपासून जावेद जाफरी (Javed Jafari) यांचा मुलगा मीजान(Meezan)  आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) यांच्या रिलेशनशिपविषयीची चांगलीच चर्चा रंगली आहे. ही चर्चा खरी आहे का? याचं उत्तर जावेद जाफरी यांनी दिलं आहे.

पुढे वाचा ...

मुंबई 8 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून जावेद जाफरी (Javed Jafari) यांचा मुलगा मीजान(Meezan)  आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) यांच्या रिलेशनशिपविषयीची चांगलीच चर्चा रंगली आहे. हे दोन्ही स्टारकीड्स एकमेकांना लहानपणापासून ओळखतात आणि ते सोबतच मोठे झाले आहेत. 2017 मध्ये या दोघांना मुंबईतील एका सिनेमागृहातून एकत्र बाहेर पडताना पाहिलं गेलं होतं, तेव्हापासूनच ते  रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यावेळी दोघांनी मीडियापासून लपण्याचा भरपूर प्रयत्न केला, मात्र तरीही त्यांचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते. आता अभिनेता जावेद जाफरी यांनी या बातमीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जावेद जाफरी यांनी त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत जावेद म्हणाले, की लोक मैत्रीचा वेगळाच अर्थ काढतात. ते म्हणाले, की लोकांना कन्टेंट पाहिजे असतो. यात चांगल्या मैत्रीचा अर्थही काहीतरी वेगळाच काढला जातो. हे दोघंही सोबतच मोठे झालेत. माझी मुलगी आणि नव्या शाळेत असतानापासूनच चांगल्या मैत्रीणी आहेत. त्यांचे खूप कॉमन फ्रेंडही आहेत. सारा अली खान आणि मीजानदेखील एकाच शाळेत शिकत होते. ती घरी आल्यावर रात्री 3 वाजेपर्यंतही हे लोक सोबत असायचे. मात्र, त्यांच्या सोबत असण्याचा अर्थ असा नाही, की ते रिलेशनशिपमध्ये आहेत.

मीजाननंदेखील नव्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे. इन्स्टाग्रामवरील त्यांचे फोटो अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. मागच्याच महिन्यात मीजानला बेस्ट डेब्यू अॅक्टरचा पुरस्कार मिळाल्यानंतर नव्यानं त्याचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला ठेवला होता. तर, याआधीही नव्यानं आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर मीजाननं कॅमेऱ्याच्या मागे असणाऱ्या व्यक्तीबद्दल विचारलं असता, नव्यानं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांनाच बुचकळ्यात पाडलं होतं. ती म्हटलं होतं, की माझा पर्सनल फोटोग्राफर आहे. तिच्या या कमेंटमुळं अनेकांनी असा अंदाज लावला होता, की कॅमेऱ्यामागचा व्यक्ती इतर कोणीही  नसून मीजान स्वतः आहे.

याआधीही मीजाननं नव्यासोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या बातम्या खोट्या असल्याचं स्पष्ट केलं होतं. सोबतच आपण सिंगल असल्याचा दावाही त्यानं केला होता. एका मुलाखतीत मीजान म्हणाला होता, की आमचे भरपूर कॉमन फ्रेंड आहेत. ती माझ्या बहिणीची खास मैत्रीण आहे आणि माझीही खूप चांगली मैत्रीण आहे. मी कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये नसल्याचं त्यांनं म्हटलं होतं.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Bollywood News