मुंबई, 31 मार्च : आरस्पानी सौंदर्य, खिळवून ठेवणारा बोलका चेहरा, वेदनेनं काठोकाठ भरलेले डोळे आणि ताकदीचा अभिनय हा सगळा ऐवज घेऊन रसिकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मीना कुमारी. लौकिकार्थांनं 31 मार्च 1972 ला त्या कॅन्सरनं गेल्या. मात्र त्यांच्या अनमोल कलाकृतींची जादू आजच्या पिढ्यांवरही चालते. (bollywood actress meena kumari) जगभरातले बहुसंख्य चाहते त्यांना ओळखतात ते कसलेली अभिनेत्री म्हणून. मात्र मीना कुमारी उर्फ महजबीन बानो यांची एक ओळख शायरा हीसुद्धा होती हे किती जणांना माहीत आहे? आपल्या हयातीत मीना कुमारी यांनी शायरी लिहिली आणि सोबतच पार्श्वगायनही केलं. (meena kumari poems) मोहक सौंदर्य, लाजवाब अभिनय आणि लखलखत्या विजेसारखं नृत्य हीच हयातभर त्यांची ओळख राहिली. पण सुंदर चेहऱ्याआड लपलेल्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या असंख्य रंगरूपाची दुःखं अगदी मोजक्या लोकांनाच ठाऊक होती. ती पूर्णतः कुणाला माहीत असतील तर त्यांच्या कवितेच्या डायरीला. ‘नाज़’ हे टोपणनाव अर्थात तख़ल्लुस घेऊन त्यांनी शायरी लिहिली. (meena kumari shayari) हेही वाचा
वाढदिवशी अजय देवगण चाहत्यांना देणार भेट; केली मोठी घोषणा
केवळ 39 वर्षांचं आयुष्य जगलेल्या मीना कुमारी यांनी मृत्यूआधी कवी-गीतकार गुलजार यांच्याकडे हे अमूल्य धन सोपवलं. आपल्या मृत्यूपत्रात मीना कुमारी यांनी त्यांच्या कवितांच्या २५ डायऱ्या गुलजार यांच्याकडे सुपूर्द केल्या जाव्या असं लिहूनही ठेवलं होतं. गुलजार यांनीही हे सगळं ताब्यात घेत जीवापाड जपलं. या हिंदी-उर्दूतल्या आशयघन नज्म-गझल प्रकाशित केल्या. ‘तन्हा चांद’ हे मीना कुमारी यांच्या कवितासंग्रहाचं नाव. गुलजार यांनी प्रकाशित केलेल्या कविता मीना कुमारी की शायरी या पुस्तकात त्यांनी एकत्र केल्या. स्वत: गुलजार यांनीही मीना कुमारी यांच्यावर एक पोर्ट्रेट नज्म लिहिली होती. ‘शहतूत की शाख़ पे बैठी मीना बुनती है रेशम के धागे लम्हा-लम्हा खोल रही है पत्ता-पत्ता बीन रही है एक-एक सांस बजाकर सुनती है सौदायन एक-एक सांस को खोल के, अपने तन पर लिपटाती जाती है अपने ही तागों की क़ैदी रेशम की यह शायर इक दिन अपने ही तागों में घुटकर मर जाएगी।’
kavitakosh.org
या हिंदीतील प्रसिद्ध संकेतस्थळावर यातील मोजक्या नज्म आणि गझला वाचायला मिळतात. (poet gulzar published meena kumari poems) हेही वाचा
‘तारे जमीन परचा दिग्दर्शक आमिर नाही मी होतो’; अमोल गुप्तेचा खळबळजनक खुलासा
ही एक मीना कुमारी यांची लोकप्रिय गझल. यात त्या म्हणतात, ‘आगाज तो होता है अंजाम नहीं होता जब तक के कहानी में वो नाम नहीं होता हँस- हँस के जवां दिल के हम क्यों न चुनें टुकडे़ हर शख्स़ की किस्मत में ईनाम नहीं होता बहते हुए आँसू ने आँखॊं से कहा थम कर जो मय से पिघल जाए वॊ जाम नहीं होता’ ही अजून एक खास गझल ‘चाँद तन्हा है आसमाँ तन्हा, दिल मिला है कहाँ-कहाँ तन्हा बुझ गई आस, छुप गया तारा, थरथराता रहा धुआँ तन्हा ज़िन्दगी क्या इसी को कहते हैं, जिस्म तन्हा है और जाँ तन्हा हमसफ़र कोई गर मिले भी कभी, दोनों चलते रहें कहाँ तन्हा राह देखा करेगा सदियों तक छोड़ जाएँगे ये जहाँ तन्हा।’ आणि ही त्यांची एक सुरेख नज्म अर्थात कविता. शीर्षक आहे ‘महंगी रात’ ‘जलती-बुझती-सी रोशनी के परे हमने एक रात ऐसे पाई थी रूह को दांत से जिसने काटा था जिस्म से प्यार करने आई थी जिसकी भींची हुई हथेली से सारे आतिश फशां उबल उट्ठे जिसके होंठों की सुर्खी छूते ही आग-सी तमाम जंगलों में लगी आग माथे पे चुटकी भरके रखी खून की ज्यों बिंदिया लगाई हो किस कदर जवान थी, कीमती थी महंगी रात हमने जो रात यूं ही पाई थी। महंगी रात….’ कुणालाही थेट भिडतील आणि अस्वस्थ करतील असे हे शब्द आहेत. हरेक रचनेतून मीना कुमारी यांच्यातल्या कमालीच्या हळव्या, प्रगल्भ आणि तत्वचिंतक व्यक्तीचं दर्शन घडतं. त्यांच्या आयुष्यात झालेले अपेक्षाभंग, सतत झालेली उपेक्षा, प्रसिद्धी, पैसा आणि चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळूनही पाठ न सोडणारं एकाकीपण शब्दांमधून दिसतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.