मुंबई 31 मार्च: बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अजय देवगण (Ajay Devgan) लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अजयच्या या आगामी चित्रपटाचं नाव आर.आर.आर. (RRR) असं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अजयसोबत राम चरण, ज्यूनियर एनटीआर आणि आलिया भट्ट हे कलाकार देखील झळकणार आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे अलिकडेच या तिनही कलाकारांचे चित्रपटातील लूक प्रदर्शित झाले. तेव्हापासून चाहते अजयचा लूक पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर त्याचा RRR मधील लूक लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. अजय आपल्या जन्मदिनी म्हणजे 2 एप्रिलला RRR मधील आपला फर्स्ट लूक रिलीज करुन चाहत्यांना रिटर्न गिफ्ट देणार आहे. हे एक मोशन पोस्टर असेल, ज्याला घेऊन स्वत: अजय देखील उत्साहित आहे. “RRR मध्ये काम करणं हा एक रोमांचित करणारा अनुभव होता. माझ्या भूमिकेविषयी सांगण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन अजयनं आपल्या आगामी चित्रपटाची माहिती दिली. अवश्य पाहा - ‘आजोबांनी केलं होतं लैंगिक शोषण, लहान बहिणीलाही सोडलं नाही,’ अभिनेत्रीचा धक्कादायक गौप्यस्फोट
अजयसोबतच अभिनेत्री आलिया भट्ट देखील RRR या चित्रपटाच्या माध्यमातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी आलियाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केला होता. हे पोस्टर तिच्या वाढदिवशी प्रदर्शित झालं होतं या चित्रपटात ती सीता ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.