• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘तारे जमीन परचा दिग्दर्शक आमिर नाही मी होतो’; अमोल गुप्तेचा खळबळजनक खुलासा

‘तारे जमीन परचा दिग्दर्शक आमिर नाही मी होतो’; अमोल गुप्तेचा खळबळजनक खुलासा

आमिरनं शेवटच्या क्षणी मला दिग्दर्शकाच्या खूर्चीतून बाहेर काढलं अन् त्याजागी तो स्वत: बसला असा आरोप अमोलनं केला आहे. खरं तर हा वाद 2007 साली घडला होता. परंतु 14 वर्षानंतर ते प्रकरण पुन्हा उफाळून बाहेर आलं आहे.

 • Share this:
  मुंबई 31 मार्च: ‘तारे जमीन पर’ (Taare Zameen Par) हा चित्रपट बॉलिवूडमधील अजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या या चित्रपटामुळं प्रेक्षकांचे डोळे पाणावले होते. या चित्रपटाच्या माध्यमातून आमिर खाननं (Aamir Khan) दिग्दर्शक म्हणून स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. परंतु खरं तर या चित्रपटाचं दिग्दर्शन आमिर नव्हे मी केलं होतं असा खळबळजनक खुलासा प्रसिद्ध दिग्दर्शक अमोल गुप्ते (Amole Gupte) यानं केला आहे. आमिरनं शेवटच्या क्षणी मला दिग्दर्शकाच्या खूर्चीतून बाहेर काढलं अन् त्याजागी तो स्वत: बसला असा आरोप अमोलनं केला आहे. खरं तर हा वाद 2007 साली घडला होता. परंतु 14 वर्षानंतर ते प्रकरण पुन्हा उफाळून बाहेर आलं आहे. अमोल गुप्ते दिग्दर्शित ‘सायना’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत त्यानं आमिरसोबत झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली. अवश्य पाहा - माधुरी दीक्षितच्या कार्यक्रमात कोरोनाचा विस्फोट; 18 जणांना झाली लागण  तारे जमीन पर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अमोल गुप्ते यानं स्विकारली होती. चित्रपटातील बहुतांश भाग त्यानंच दिग्दर्शित केला होता. परंतु या दरम्यान त्याचे आमिरसोबत अनेकदा खटके उडाले. त्यामुळं शेवटच्या क्षणी आमिरनं अमोलला दिग्दर्शकपदावरुन काढलं अन् स्वत: दिग्दर्शक म्हणून नाव लावलं. असा आरोप अमोलनं 14 वर्षांपूर्वी केला होता. त्या प्रसंगावर अमोल म्हणाला, “या घटनेला आता बराच काळ लोटला आहे आणि त्याचा आता मला काहीच फरक पडत नाही. सूर्यास्तानंतर नेहमीच सूर्योदय होतो आणि मी भूतकाळात रमत बसणारी व्यक्ती नाही, जी सतत दुःखाचे कढ उकळत बसेल. आलेला प्रत्येक दिवस बैलासारखा शिंगांवर घेण्यावर मी विश्वास ठेवतो आणि नवीन दिवसात आपल्यासाठी काय आहे, ते पाहतो. गेल्या 14 वर्षांपासून आपली कला जोपासत चित्रपटसृष्टीत टिकून राहू शकण्याचे हे एकमेव कारण आहे.” तारे जमीन पर या चित्रपटाची पटकथा अमोल गुप्तेनेच लिहिली होती. या कथेसाठी त्यांची प्रचंड स्तुती करण्यात आली होती. त्याला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात देखील आलं होतं.
  Published by:Mandar Gurav
  First published: