मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Timepass 3 trailer: 'थोबडा चिकना नसला तरी चालेल हार्ट चिकना पायजे' हृताचा रापचिक अंदाज, ट्रेलर आऊट

Timepass 3 trailer: 'थोबडा चिकना नसला तरी चालेल हार्ट चिकना पायजे' हृताचा रापचिक अंदाज, ट्रेलर आऊट

हृता दुर्गुळेला आजपर्यंत कधीच न पाहिलेल्या अवतारात ती चाहत्यांना बघायला मिळत आहे. टाईमपास 3 चा हा ट्रेलर फारच पसंत केला जात आहे.

हृता दुर्गुळेला आजपर्यंत कधीच न पाहिलेल्या अवतारात ती चाहत्यांना बघायला मिळत आहे. टाईमपास 3 चा हा ट्रेलर फारच पसंत केला जात आहे.

हृता दुर्गुळेला आजपर्यंत कधीच न पाहिलेल्या अवतारात ती चाहत्यांना बघायला मिळत आहे. टाईमपास 3 चा हा ट्रेलर फारच पसंत केला जात आहे.

  • Published by:  Rasika Nanal

मुंबई 15 जुलै: अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या बरीच चर्चेत आहे आणि त्याला वेगवेगळी कारणं आहेत. हृताच्या करिअरने घेतलेली झेप बघता हृता अनेक मोठ्या प्रोजेक्टमधून एक्झिट घेताना दिसत आहे. या महिन्यात हृताच्या दोन सिनेमाची बॉक्स ऑफिसवर एंट्री होणार आहे. तिच्य एक महत्त्वाच्या सिनेमाचा म्हणजे (Timepass 3 trailer out) टाईमपास 3 चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

यामध्ये हृता दुर्गुळे (Hruta Durgule in timepass 3) कधीच न पाहिलेल्या रावडी आणि रापचिक अंदाजात दिसणार आहे. प्राजूच्या एक्झिट नंतर दगडूच्या आयुष्यात आलेलं हे दुसरं फूल एकदमच बिनधास्त आहे आणि या सिनेमात दगडू आणि पालवीची धमाल लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे.

या सिनेमात जुन्या टाईमपास मधले सगळे भन्नाट कलाकार त्यांच्या भन्नाट भूमिकांमध्ये दिसणार आहेतच पण काही नवी पात्रं सुद्धा यामध्ये पाहायला मिळणार आहेत. संजय नार्वेकर यांची या सिनेमात एक डॅशिंग भूमिका असल्याचं ट्रेलरमध्ये दिसून आलं आहे. तसंच काही जुने आणि गाजलेले विनोद सुद्धा यामध्ये पुन्हा ऐकायला मिळतील.

ट्रेलरच्या एकूण मांडणीवरून एक धमाल कॉमेडी करणारा हा सिनेमा असणारच याची खात्री वाटत आहे तसंच एक गोड लव्हस्टोरी सुद्धा यात दिसून येईल असं ट्रेलरवरून सांगता येऊ शकेल. 2 नंबर लवचा 1 नंबर लोचा अशी हटके टॅगलाईन सुद्धा या सिनेमाला देण्यात आली आहे. आता पालवी आणि दगडू यांचं प्रेम होणार का त्याचा टाईमपास समजून गेम होणार हे सिनेमा रिलीज झाल्यावर समजेल.

हे ही वाचा- Hruta Durgule : अनन्यासाठी हृतानं घेतली प्रचंड मेहनत; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

सध्या तरी या ट्रेलरला बराच कमाल प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या कलरफुल ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. चाहत्यांचा लाडका दगडू पुन्हा एकदा भेटीला येत असल्याने ट्रेलर बघून सिनेमाची आतुरता वाढत आहे. तसंच या सिनेमात हृता दुर्गुळेचा कधीही न पाहिलेला अंदाज समोर येणार आहे.

" isDesktop="true" id="732578" >

हृता एका टपोरी भाषेत बोलताना दिसणार आहे. आजपर्यंत सुंदर वैदेही, गुणी दिपू, खट्याळ मन्या अशा भूमिका केल्यानंतर हृताचं डॅशिंग आणि ठसकेबाज रूप यात दिसून येणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

हृताच्या चाहत्यांसाठी बऱ्याच निराशाजनक बातम्यांनंतर एक आनंदाची बातमी मिळाली असल्याने चाहत्यांमध्ये आनंद असल्याचं दिसून आलं आहे.

First published:

Tags: Marathi actress, TIME PASS, Time pass marathi movie, Timepass