जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Hruta Durgule : अनन्यासाठी हृतानं घेतली प्रचंड मेहनत; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Hruta Durgule : अनन्यासाठी हृतानं घेतली प्रचंड मेहनत; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Hruta Durgule in Ananya

Hruta Durgule in Ananya

हृताचा अनन्या बनण्याचा प्रवास कसा होता त्यासंबंधी थक्क करणारा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओतून अभिनेत्री हृता दुर्गुळेने अनन्याच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असल्याचं दिसून येत आहे. हृता दुर्गुळे गुणी अभिनेत्री असल्याचं आता तिने सिद्ध केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 जुलै : प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ (Ananya marathi movie) येत्या २२ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनन्याची भूमिका अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने साकारली आहे. अनन्या चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच चित्रपटातील हृताच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता हृताचा अनन्या बनण्याचा प्रवास कसा होता त्यासंबंधी थक्क करणारा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओतून अभिनेत्री हृता दुर्गुळेने अनन्याच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असल्याचं दिसून येत आहे. हृता दुर्गुळे गुणी अभिनेत्री असल्याचं आता तिने सिद्ध केलं आहे. नुकताच हृताने एका व्हिडिओमधून तिचा अनन्या बनण्याचा प्रवास प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने सांगितले कि,’ माझा ‘अनन्या’पर्यंत पोहोचण्याचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. मला या भूमिकेसाठी प्रचंड शारीरिक मेहनत घ्यावी लागली’. तसेच तिने अनन्याला फक्त अभिनयापुरतं मर्यादित न ठेवता या प्रवासात हृताने ‘अनन्या’ला कसे आपलेसे केले आहे, हेहि तिने शेअर केले आहे. हृताने घेतलेली प्रचंड मेहनत या व्हिडिओत दिसत आहे.

जाहिरात

या मेहनतीबाबत हृता दुर्गुळेने सांगितलं कि , ‘’ या चित्रपटासाठी मला शारीरिक मेहनत घ्यायची आहे, हे सुरुवातीपासूनच मला ठाऊक होते आणि त्यासाठी मला मानसिकदृष्ट्या खंबीर राहाणे आवश्यक होते. सर्वात आधी माझ्यासमोर वजन कमी करण्याचे आव्हान होते. या दरम्यानच माझे योगा आणि व्यायामाचे प्रशिक्षण सुरू होते. या काळात मी प्रचंड आव्हानात्मक गोष्टी केल्या. अक्षरशः मी रडायचे, कळवळायचे. एका अशा वळणावर मी आले होते की, असे वाटत होते सोडून द्यावे.’’ हेही वाचा -  Hemangi Kavi Post: हेमांगी कवीच्या ‘त्या’ पोस्टला 1 वर्ष पूर्ण; काय होत नेमकं ते प्रकरण? पुढे हृताने सांगितलं कि, ‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे’ या चित्रपटाच्या टॅगलाईननेच मला स्फूर्ती दिली हेच डोक्यात ठेवून मग मी हे आव्हान स्वीकारायचे ठरवले. मला दोन्ही हात नाहीत, हेच मी डोक्यात ठेवून पुढे वावरायला लागले आणि तेव्हाच मला ‘अनन्या’ सापडली. मी ‘अनन्या’शी एवढी एकरूप झाले होते की, पडद्यामागेही अनेक गोष्टी करताना माझ्यात ‘अनन्या’च असायची. ही आयुष्याची एक सकारात्मक लढाई आहे, जी ध्येयाकडे नेणारी आहे. ‘अनन्या’ साकारताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, आपल्याकडे जे आहे, त्यात आनंद मानावा.’’ हृता दुर्गुळेने सांगितलेला हा आणण्याचा प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे नक्कीच आकर्षित करेल. तिच्या चाहत्यांना या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. हृताची झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ हि मालिका जरी प्रेक्षकांचा निरोप घेणार असली तरी ती ‘अनन्या’ आणि ‘टाईमपास ३’ या चित्रपटांतून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात