मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

हृताचा Timepass 3 वादात; सिनेमातील ती दृश्य तातडीने काढून टाकण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?

हृताचा Timepass 3 वादात; सिनेमातील ती दृश्य तातडीने काढून टाकण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?

'टाइमपास 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असताना सिनेमा वादाच्या भोवऱ्यात आला आहे. सिनेमातील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या.

'टाइमपास 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असताना सिनेमा वादाच्या भोवऱ्यात आला आहे. सिनेमातील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या.

'टाइमपास 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असताना सिनेमा वादाच्या भोवऱ्यात आला आहे. सिनेमातील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई,  1 ऑगस्ट:  महाराष्ट्रीत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी 'टाइमपास 3' हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळेचा डॅशिंग अंदाज आणि प्रथमेश परबनं साकारलेला दगडूनं सिनेमात धम्माल उडवून दिली आहे. 'टाइमपास' आणि 'टाइमपास 2' च्या यशानंतर टाइमपास 3 देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला मात्र असं असताना सिनेमा काहीसा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमातील काही दृष्य तातडीने काढून टाकण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मराठी एकीकरण समितीनं केली आहे. तसेच सिनेमाच्या दिग्दर्शकांना याविषयी माफी देखील मागण्याची मागणी करण्यात आली आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या. 'टाइमपास 3' हा सिनेमा 29 जुलै रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. सिनेमात अभिनेत्री हृता दुर्गुळेनं पालवीची भूमिका साकारलीय तर अभिनेता प्रथमेश परबनं दगडूची भूमिका साकारली आहे. रवी जाधव यांचं दिग्दर्शन असलेल्या टाइमपास 3 या सिनेमात हिंदी ही राष्ट्रभाषा आहे अशी खोटी माहिती दाखण्यात आली आहे असा आरोप मराठी एकीकरण समितीनं आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचे पुरावे द्या अन्यथा माफी मागा अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या अफवा पसरवणे हा गुन्हा असून सिनेमातून तो करण्यात आला आहे. त्यामुळे सिनेमातील ती दृश्य तातडीनं काढून टाकावीत अशी मागणी देखील करण्यात आली आहे. सिनेमाचे दिग्दर्शक यासाठी सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा देखील मराठी एकीकरण समितीनं व्यक्त केली आहे. हेही वाचा - Ajinkya Raut: मन उडू उडू झालं नंतर इंद्रा दिसणार मराठीतील टॉप बोल्ड सिनेमात मराठी एकीकरण समितीनं केलेल्या या आरोपांवर टाइमपास 3 सिनेमाचे दिग्दर्शक रवी जाधव यांच्याकडून किंवा सिनेमाच्या कोणत्याही टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आता या गोष्टीचा टाइमपास 3 या सिनेमावर काही परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.  कारण गेली अनेक महिने प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे अनेक मराठी सिनेमे 1-2 आठड्यातच सिनेमागृहातून काढून टाकण्यात आलेत. टाइमपास 3 सिनेमा सर्वाधिक काळ सिनेमागृहात चालेल अशी अपेक्षा आहे. टाइमपास 3 सिनेमाच्या यशाविषयी सांगायचं झालं तर सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. सिनेमानं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 80 लाखांची कमाई केली.  सिनेमाचं एकूण बजेट 10 कोटी रुपये असून पहिल्याच आठवड्यात सिनेमानं 1 कोटी 10 लाखांचा गल्ला जमवला आहे.
First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Time pass marathi movie

पुढील बातम्या