जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Ajinkya Raut: मन उडू उडू झालं नंतर इंद्रा दिसणार मराठीतील टॉप बोल्ड सिनेमात

Ajinkya Raut: मन उडू उडू झालं नंतर इंद्रा दिसणार मराठीतील टॉप बोल्ड सिनेमात

Ajinkya Raut: मन उडू उडू झालं नंतर इंद्रा दिसणार मराठीतील  टॉप बोल्ड सिनेमात

सगळ्यांचा लाडका इंद्रा मालिकातून जरी प्रेक्षकांची रजा घेत असला तरी अभिनेता अजिंक्य राऊत मराठीतील टॉप बोल्ड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 ऑगस्ट:  झी मराठीवरील सर्वांची लाडकी मालिका असलेली ‘मन उडू उडू झालं’ आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेत कलाकारांनी अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. मालिकेतील इंद्रा दीपू तर प्रेक्षकांचे लाडके झाले आहेत. या मालिकेच्या निमित्तानं साऊथ इंडियसन टच असलेला चॉकलेट बॉय प्रेक्षकांना पाहायला मिळाला. इंद्रा म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊतनं आपल्या कडक अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या आधी पौराणिक मालिकेत काम केलेल्या अंजिक्यला प्रेक्षक कशाप्रकारे स्वीकारतील असा प्रश्न होत मात्र अंजिक्यनं अल्पावधीत इंद्रा बनून महाराष्ट्रातील तमामा प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला. त्यामुळे आता मालिका संपणार आहे असं कळताच अजिंक्यचे चाहते मात्र चांगलेच नाराज झालेत. असं असलं ती सगळ्याचा लाडका इंद्रा म्हणजेच अभिनेता अंजिक्य राऊत एका नव्या अवतारात नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   मराठीतील सर्वात बोल्ड कंटेट असलेल्या ‘टकाटक 2’ मध्ये अजिंक्य राऊत दिसणार आहे.   अजिंक्यचा नवा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘टकाटक’च्या घसघसीत यशानंतर ‘टकाटक 2’ हा सिनेमा प्रेक्षाकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सिनेमा येत्या 18 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. प्रथमेश परब प्रमुख भूमिकेत असलेल्या टकाटक 2मध्ये अभिनेता अंजिक्य राऊत देखील प्रमुख भूमिकेत आहे. दोघांचा खरतनाक अंदाज सिनेमात पाहायला मिळणार आहे. मराठीतील सर्वात बोल्ड कंटेट या सिनेमात दिसणार आहे असं म्हटलं जात आहे. हेही वाचा - Ankush Chaudhri: सूर्या आणि डॅडी समोरासमोर; नजरेत आग असलेला अंकुशचा लुक चर्चेत सिनेमाच्या ट्रेलरनेच सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अभिनेता प्रथमेश परब बरोबर अंजिक्य राऊत बोल्ड कॉमेडी करताना पाहून अजिंक्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

टकाटक 2 मधील गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. ज्यात अजिंक्य राऊत दणक्यात नाचताना दिसत आहे. सिनेमातील ‘लगीन घाई’ हे गाणं देखील प्रदर्शित होणार आहे. याधीही ‘घे टकाटक दे टकाटक’ हे गाणं देखील प्रदर्शित झालं आहे. दोन्ही गाण्यांमध्ये अंजिक्य राऊतचा भन्नाट अंदाज पाहायला मिळत आहे.  अंजिक्यचा हा पहिलाच सिनेमा असणार आहे त्यामुळे नव्या सिनेमासाठी तो देखील उत्साही असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेता अंजिक्य राऊतनं ‘विठू माऊली’ या पौराणिक मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तो ‘मन उडूउडू झालं’ या मालिकेत दिसला आणि आता थेट बोल्ड कॉमेडी असलेल्या सिनेमात अंजिक्य सर्वांसमोर येणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका आजवर अजिंक्यला करायला मिळाल्या आहेत. अंजिक्य ‘टकाटक 2’ शिवाय आणखी मराठी सिनेमात दिसणार आहे. लवकरचं त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात