मुंबई, 13 जुलै- छोट्या पडद्यावर सध्या अनेक नव्या मराठी मालिका (Marathi Serials) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर काही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. झी मराठीवरील प्रचंड लोकप्रिय ठरलेली मालिका 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zal) आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. या मालिकेचा शेवटच्या भागाचं शूटिंगसुद्धा पार पडलं आहे. मात्र मालिका बंद होत असल्याने प्रेक्षक प्रचंड नाराज आहेत. अनेकजण सोशल मीडियाद्वारे आपलॆ नाराजी व्यक्त करत आहेत.
'मन उडू उडू झालं' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील इंद्रा आणि दिपूची (Indra-Deepu) हटके केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच पसंत पडत आहे. ही भूमिका अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊतने साकारली आहे. सोबतच दीपू आणि शलाका या बहिणींचं बॉन्डिंगदेखील प्रेक्षकांना फारच आवडलं आहे. ही मालिका सध्या एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे.मात्र येत्या काही एपिसोड्समध्येच ही मालिका आटोपती घेणार आहेत. अर्थातच ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
मात्र मालिका बंद होत असल्याची माहिती सोशल मीडियावर येताच चाहते प्रचंड निराश झाले आहेत. सतत सोशल मीडियावर मालिका बंद करण्याची मागणी केली जात आहे. यातील काहींनी कमेंट्स करत लिहलंय, 'मालिका खूप छान वाटते पाहायला, प्लिज बंद नका करु, तर दुसऱ्या एकाने लिहलंय, मालिकेला टीआरपी असूनही मालिका का बंद केली जात आहे, ही मालिका बंद झाल्यास आम्ही कोणतीच मालिका पाहणार नाही. तर आणखी एकाने लिहलंय, खूप छान मालिका आहे का इतक्या लवकर बंद होतेय, मालिकेत किती मस्त ट्रॅक सुरु आहे मालिका बंद का करताय?' अशा अनेक कमेंट्स सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
प्रेक्षकांना पसंत पडलं कथानक-
'मन उडू उडू झालं' या लोकप्रिय मालिकेत कमी शिकलेला परंतु प्रामाणिक,हळवा इंद्रा आणि सुशिक्षित,बँकेत नोकरी करणारी, हुशार परंतु तितकीच हळवी दीपू यांच्यावर आधारित ही मालिका आहे. या दोघांची हटके केमिस्ट्री प्रचंड चर्चेत आली होती. तसेच मालिकेत देशपांडे गुरुजींच्या तीन मुली दाखविण्यात आल्या आहेत. दीपू, शलाका आणि सानिका अशा या लेकींची नावे आहेत. यामधील सानिका ही फटकळ आणि कोणाशीही न पटवून घेणारी आहे. तर दिपू आणि शलाका यांच्यात खूप चांगलं बॉन्डिंग दाखविण्यात आलं आहे. या दोघीही अतिशय समजुतदार आणि कठीण काळात ठामपणे एकमेकींच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या आहेत. त्यामुळे मालिकेतील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial