जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / टायगर श्रॉफवर कोसळलं होतं आर्थिक संकट; घर विकून झोपत होता जमिनीवर

टायगर श्रॉफवर कोसळलं होतं आर्थिक संकट; घर विकून झोपत होता जमिनीवर

टायगर श्रॉफवर कोसळलं होतं आर्थिक संकट; घर विकून झोपत होता जमिनीवर

प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट इंटरनेटवर लीक झाला होता. चित्रपट लीक झाल्यामुळे श्रॉफ कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलं होतं.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई 26 जुलै: टायगर श्रॉफ हा बॉलिवूडच्या नव्या फळीमधील आघाडीचा अभिनेता. जॅकी श्रॉफचा मुलगा म्हणून बॉलिवूडमध्ये आलेल्या टायगरने (Tiger Shroff) पहिल्या चित्रपटापासूनच आपली वेगळी ओळख निर्माण केली, आणि पुढे ती जपलीही. खरं तर आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये करिअर (Tiger Shroff Bollywood career) करावं असा विचार टायगरने कधीच केला नव्हता. मात्र, त्यांच्या कुटुंबावर ओढावलेल्या आर्थिक संकटामुळे (Tiger Shroff financial crisis) त्याला बॉलिवूडमध्ये काम करण्याची प्रेरणा मिळाली, असं टायगरने एका मुलाखतीमध्ये (Tiger Shroff interview) स्पष्ट केलं होतं. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार जॅकी श्रॉफची पत्नी, आणि टायगरची आई आयेशा श्रॉफ यांनी 2002 साली बूम या चित्रपटाची निर्मिती केली होती. मात्र, प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट इंटरनेटवर लीक (Boom Movie leak) झाला होता. चित्रपट लीक झाल्यामुळे डिस्ट्रिब्युटर्सनी याच्या प्रदर्शनासाठी खर्च करण्यास नकार दिला. यानंतर जॅकी श्रॉफने स्वतःच या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा खर्च उचलला होता. जॅकी श्रॉफ, अमिताभ बच्चन, गुलशन ग्रोव्हर, पद्मा लक्ष्मी, मधू सप्रे, झीनत अमान आणि कॅटरिना कैफ अशी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन कैझाद गुस्ताद याने केलं होतं. कॅटरिनाचा हा बॉलिवूडमधील पहिलाच चित्रपट. एकदम तगडी स्टारकास्ट असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईट आपटला होता. यामुळेच मग जॅकी आणि त्याच्या कुटुंबाला आपले बांद्रामधील फोर-बेडरुम अपार्टमेंट सोडून (Jackie Shroff house sold) एका लहान घरात जावं लागलं होतं. ‘महाराष्ट्रात राहून पैसे कमावता अन् संकट आलं की पळता’; अमेय खोपकर यांचा बॉलिवूडवर निशाणा टायगरने आपल्या मुलाखतीत सांगितले, की “तो काळ आमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. एक-एक करुन आमच्या घरातील सर्व सामान विकलं जात होतं. (Tiger Shroff furniture sold) माझ्या आईच्या आवडत्या गोष्टी, आमचं फर्निचर, घरातील लॅम्प सगळं विकलं जात होतं. पुढे तर माझा बेडही विकला गेला, ज्यामुळे मला जमिनीवर झोपवं (Tiger Shroff sleep on floor) लागलं होतं. तेव्हा मी केवळ ११ वर्षांचा होतो. मला काम करुन आई-वडिलांना मदत करायची होती. पण, तेव्हा मी काहीच करू शकत नव्हतो. या सगळ्यामुळेच मी पुढे बॉलिवूडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. मी आईला वचन दिलं होतं, की मी आपलं घर परत मिळवेन.” खरंच Taarak Mehta सोडणार का? viral ‘gossip’वर बबितानं दिली प्रतिक्रिया 2014 मध्ये हिरोपंती सिनेमातून टायगरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तीन वर्षांमध्ये त्याने एवढे पैसे कमावले होते, की ते घर तो पुन्हा विकत घेऊ शकेल. मात्र, त्याच्या आईने आपल्याला ते घर नको असल्याचं सांगितलं. ‘जे गेलं ते गेलं, त्यामुळे आता असूदे.’ असं त्या म्हणाल्या. मात्र, टायगरने घर विकत घेण्याची दाखवलेली तयारी पाहून जॅकी आणि आयेशा दोघेही अत्यंत खुश होते. आपल्याला आपल्या दोन्ही मुलांचा अभिमान वाटतो, असं जॅकीने एका मुलाखतीत म्हटलं होतं. सध्या जॅकी आणि आयेशा त्याच घरात राहतात, जिथे ते बूमनंतर गेले होते. याच इमारतीत अभिनेता आमीर खानही राहतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात