मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

खरंच Taarak Mehta सोडणार का? viral ‘gossip’वर बबितानं दिली प्रतिक्रिया

खरंच Taarak Mehta सोडणार का? viral ‘gossip’वर बबितानं दिली प्रतिक्रिया

मूनमूनने तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली असल्याची अफवा उठली आणि तिला स्वत: स्पष्टीकरण द्यावं लागलं.

मूनमूनने तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली असल्याची अफवा उठली आणि तिला स्वत: स्पष्टीकरण द्यावं लागलं.

मूनमूनने तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली असल्याची अफवा उठली आणि तिला स्वत: स्पष्टीकरण द्यावं लागलं.

मुंबई 26 जुलै: टीव्हीच्या राज्यात अनेक कलाकार अत्यंत प्रसिद्ध असतात. त्यांच्या प्रसिद्धीमुळे जसं त्याचं कौतुक होतं तसंच त्यांच्यावर टीका, आरोप किंवा त्यांच्याबद्दल नसत्या चर्चाही होत असतात. त्यामुळे प्रसिद्धी सांभाळणं ही पण खूप अवघड गोष्ट असते. टीव्हीवरच्या तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या हिंदी मालिकेतील सगळ्याच कलाकारांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेत बबीताजींची भूमिका साकारणारी अभिनेत्री मूनमून दत्ता (Actress Munmun Dutta) हिलाही गेल्या काळात टीकेचा सामना करावा लागला. जातीवाचक भाषा वापरल्यामुळेवर तिच्या सोशल मीडियावर (Social Media) जबरदस्त टीका झाली होती. त्यानंतर आता नवीनच गोष्ट सुरू झाली. मूनमूनने तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली असल्याची अफवा उठली आणि तिला स्वत: स्पष्टीकरण द्यावं लागलं.

‘शिल्पा शेट्टीला हे धंदे नक्कीच माहित असणार’; शक्तिमानचा Pornography प्रकरणावरून टोला

माझ्या खासगी आयुष्यावर झाला नकारात्मक परिणाम

मूनमून दत्ता गेले काही दिवस शूटिंगसाठी (Shooting) आलीच नाही त्यामुळे तिनी ही मालिका सोडून दिली आहे अशा बातम्या काही माध्यमांनी दिल्या. त्यामुळे चर्चेला उधाण आलं. मूनमून नाही तर नवी बबीता कोण? इथपर्यंत चर्चा झाल्या. मग मूनमूनने पुढे येऊन स्पष्टीकरण दिलं. ई टाइम्सशी बोलताना ती म्हणाली, ‘ गेल्या दोन-तीन दिवसांत माझ्याबद्दल काही माध्यमांनी अशा खोट्या बातम्या दाखवल्या की त्याचा माझ्या खासगी आयुष्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे. मी तारक मेहता का उल्टा चश्मा शो च्या सेटवर रिपोर्ट केलं नाही असं लोक म्हणत आहेत. हे धादांत खोटं आहे. सत्य तर हे आहे की शोच्या कथानकामध्ये माझ्या व्यक्तिरेखेची गरजच नव्हती त्यामुळे मला शूटिंगला बोलवलंच नव्हतं. आता जर मला बोलवलंच नसेल तर मी जाऊन रिपोर्ट करणं गरजेचं नाही. कथानकात पुढे काय घडणारा याचा निर्णय प्रॉडक्शनची टीम (Production Team) ठरवते. तो निर्णय माझा नसतो. मी फक्त प्रॉडक्शन टीम आणि दिग्दर्शक सांगतील तेवढं काम मी करते आणि परत घरी येते. म्हणजे काय कथानकात माझ्या भूमिकेची गरजच नसेल तर मी शूटिंग करणार नाही. ’

करिअर फ्लॉप पण जगतोय राजासारखा; ‘मोहब्बतें’ फेम जुगल हंसराज करतोय काय?

मीच सांगेन बातमी

मूनमूनने मालिका सोडल्याची चर्चा सुरू होती त्याबद्दल विचारल्यावर तिने स्पष्टीकरण दिलं. ती म्हणाली, ‘ या मालिकेने मला टीव्ही जगतात ओळख निर्माण करून दिली आहे. माझी भूमिका आवडणारा एक प्रेक्षक वर्ग आहे. जर मालिकेत काम न करण्याचा निर्णय घेतला तर या प्रेक्षकांना ते सांगणं ही माझी जबाबदारी आहे आणि सत्य जाणून घेणं त्यांचा अधिकार आहे. जर मी तसा निर्णय घेतला तर लोकांना अंदाज व्यक्त करायला वाव न देता स्वत: माध्यमांना ती बातमी देईन.’

First published:

Tags: Entertainment, Taarak mehta ka ooltah chashma, Tv actress