जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘महाराष्ट्रात राहून पैसे कमावता अन् संकट आलं की पळता’; अमेय खोपकर यांचा बॉलिवूडवर निशाणा

‘महाराष्ट्रात राहून पैसे कमावता अन् संकट आलं की पळता’; अमेय खोपकर यांचा बॉलिवूडवर निशाणा

‘महाराष्ट्रात राहून पैसे कमावता अन् संकट आलं की पळता’; अमेय खोपकर यांचा बॉलिवूडवर निशाणा

अशा प्रतिकूल परिस्थितीत बॉलिवूडवाले कुठे आहेत? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष (MNS) अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 26 जुलै: गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतोय. (Heavy rainfall) या पावसामुळे राज्यातील लोकांची जणू झोपच उडाली आहे. सगळीकडे पाणीच पाणी अशी अवस्था झाली आहे. कधीनव्हे ते यावर्षी कोकणात देखील पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. (Heavy rainfall konkan) तेथील लोकांचं आयुष्य विस्कळीत झालं आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत बॉलिवूडवाले कुठे आहेत? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष (MNS) अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियाद्वारे बॉलिवूड कलाकारांवर जोरदार टीका केली. “इतर राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर बॉलिवूडमधून मदतीसाठी अनेकजण पुढे येतात. माझ्या राज्यात पूर आल्यानंतर एकाही बॉलिवूड कलाकाराला साधं ट्विटही करावंसं वाटत नाही, याचं आश्चर्य वाटतं. अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदतकार्य सुरू केलं आहे. आमचे महाराष्ट्र सैनिकही झटतायत. अशावेळी माझ्याच महाराष्ट्रात राहून मोठं झालेल्या बड्या बॉलिवूड ताऱ्यांनी थोडं संवेदनशील व्हावं आणि मदत कार्याला हातभार लावावा, असं जाहीर आवाहन करतो.” अशा शब्दात अमेय खोपकर यांनी बॉलिवूडवर निशाणा साधला. ‘पुरामुळे 150 बळी, मात्र मराठी कलाकार गप्पच’; संतापलेल्या चाहत्यांचा रोखठोक सवाल

जाहिरात

एका फोटोमुळे संपलं माहिकाचं करिअर; Pornstar म्हणून झाली होती ट्रोल रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी 7 मीटर असून सध्या ती 8 मीटर वरून वाहते आहे. वशिष्टी नदीची धोका पातळी 7 मीटर असून ती 7.8 मीटर वरून वाहते आहे. काजळी नदी धोका पातळीच्या 1.74 मीटर वरून वाहत असून कोदवली, शास्त्री, बावनदी या नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. यामुळे खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर या शहरे व परिसरातील गावांमध्ये शासकीय यंत्रणांनी नागरिकांना हलविणे, स्थलांतर करणे व इतर मदत कार्य जोरात सुरु केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात