मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Disha Patani-Tiger Shroff: दिशाने टायगरकडे केली होती मोठी मागणी?समोर आलं ब्रेकअपचं खरं कारण

Disha Patani-Tiger Shroff: दिशाने टायगरकडे केली होती मोठी मागणी?समोर आलं ब्रेकअपचं खरं कारण

बॉलिवूड लव्हबर्ड्स टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांच्या ब्रेकअपच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत.

बॉलिवूड लव्हबर्ड्स टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांच्या ब्रेकअपच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत.

बॉलिवूड लव्हबर्ड्स टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांच्या ब्रेकअपच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत.

मुंबई,29 जुलै- बॉलिवूड लव्हबर्ड्स टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांच्या ब्रेकअपच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. त्यांच्या ब्रेकअपबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यांच्या विभक्त होण्यामागे नेमकं कोणतं कारण असेल? हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. दरम्यान आता त्यांच्या ब्रेकअपचं खरं कारण समोर आलं आहे. पाहूया या दोघांमध्ये नेमकं काय घडलंय.

बॉलिवूड कलाकारांच्या खाजगी आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. मग त्यांची फॅमिली असो किंवा लव्हलाईफ. असंच काहीसं टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनीसोबतसुद्धा झालं आहे. या दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. या दोघांच्या खाजगी आयुष्याबाबत त्यांचे चाहते नेहमीच सतर्क असतात. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी खळबळ माजवली आहे. टायगर आणि दिशाच्या ब्रेकअपमुळे त्यांचे चाहतेसुद्धा नाराज आहेत. त्यांना यामागचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

दरम्यान ई टाइम्स एक रिपोर्ट शेअर केला आहे. यानुसार टायगर आणि दिशाच्या ब्रेकअपचं कारण समोर आलं आहे. या रिपोर्टनुसार, टायगर-दिशाच्या ब्रेकअपचं खरं कारण दुसरं काही नसून 'लग्न' असल्याचं म्हटलं जात आहे. ई टाइम्सच्या रिपोर्टनुसार, दिशा टायगरला आता माझ्याशी लग्न कर असा हट्ट करत होती. मात्र टायगर त्यासाठी तयार नव्हता. टायगरने दिशाला उत्तर देत आत्ताच नाही. असं म्हटल्याचं सांगण्यात आलं आहे.

(हे वाचा: Tiger Shroff-Disha Patani- टायगर-दिशाच्या ब्रेकअपवर वडील जॅकीने सोडलं मौन, म्हणाले...)

वास्तविक या दोघांनी नात्याबाबत अधिकृत खुलासा केला नव्हता. त्यांनी कधीही सार्वजनिक ठिकाणी आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचं मान्य केलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी आपल्या ब्रेकअपबाबतसुद्धा कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीय. हा रिपोर्टसुद्धा कितपत खरा आहे, याबाबत दोघांनी किंवा त्यांच्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीने अधिकृतपणे स्पष्ट केलेलं नाहीय.

First published:

Tags: Bollywood News, Disha patani, Entertainment, Tiger Shroff