मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Tiger Shroff-Disha Patani- टायगर-दिशाच्या ब्रेकअपवर वडील जॅकीने सोडलं मौन, म्हणाले...

Tiger Shroff-Disha Patani- टायगर-दिशाच्या ब्रेकअपवर वडील जॅकीने सोडलं मौन, म्हणाले...

बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस आणि फिटनेस फ्रिक कपल अशी टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनीची ओळख होती. परंतु या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला आहे.

बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस आणि फिटनेस फ्रिक कपल अशी टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनीची ओळख होती. परंतु या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला आहे.

बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस आणि फिटनेस फ्रिक कपल अशी टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनीची ओळख होती. परंतु या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला आहे.

मुंबई, 28 जुलै-   बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस आणि फिटनेस फ्रिक कपल अशी टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनीची ओळख होती. परंतु या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला आहे. सध्या सोशल मीडियावर या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान आता ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी आपल्या मुलाच्या ब्रेकअपबाबत प्रतिक्रिया दिल्याचं म्हटलं जात आहे. पाहूया त्यांनी नेमकं काय म्हटलंय.

बॉलिवूड कलाकारांच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडतं. या कलाकारांच्या प्रत्येक लहान-लहान गोष्टींवर चाहत्यांचं लक्ष असतं. मग त्यांचे चित्रपट असो, स्टाईल असो किंवा लव्हलाईफ असो. या प्रत्येक गोष्टीबाबत जाणून घ्यायला प्रेक्षक प्रचंड उत्सुक असतात. अशातच कलाकारांचा ब्रेकअप वगैरे झाला तर त्याचं दुःख चाहत्यांमध्येसुद्धा पाहायला मिळतं. असच काहीसं टायगर आणि दिशाच्या बाबतीतसुद्धा झालं आहे. या दोघांचा ब्रेकअप झालाय कि या निव्वळ अफवा आहेत. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीय. परंतु आता या प्रकरणावर टायगरचे वडील आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी काय म्हटलंय ते पाहूया.

बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांनी टायगर आणि दिशाच्या ब्रेकअपबाबत म्हटलंय, ते नेहमीच एक चांगले मित्र होते. आणि आजही आहेत. त्या दोघांना मी नेहमीच सोबत एन्जॉय करताना हँगआउट करताना पाहिलं आहे. पण हे सर्व यासाठी नाही पाहिलं की मला माझ्या मुलाची लव्हलाईफ ट्रॅक करायची होती. त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावणं ही शेवटची गोष्ट असेल जी मला करायला आवडेल. पण मला वाटतं ते चांगले मित्र आहेत. आणि त्यांना चित्रपटांव्यतिरिक्तसुद्धा एकमेकांसोबत वेळ घालवणं पसंत आहे.

(हे वाचा: Tiger Shroff- Disha Patani breakup: टायगर-दिशा यांचं ब्रेकअप; 6 वर्षांचं नातं संपुष्टात )

त्यांनतर जॅकी यांनी म्हटलंय, ''हे त्यांचं खाजगी आयुष्य आयुष्य आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीबाबत त्या दोघांनाच निर्णय घ्यायचा आहे. त्यांच्यावर अवलंबून आहे त्यांना सोबत राहायचं आहे की नाही. ते एकमेकांसोबत आनंदी आणि कम्फर्टेबल आहेत की नाहीत. ही त्यांची लव्हलाईफ आहे. जशी माझी आणि माझ्या पत्नीची आहे. दिशासोबत आमचं चांगलं बॉन्डिंग आहे. ते जेव्हा सोबत असतात, आनंदी दिसतात'. असं म्हणत जॅकी श्रॉफ यांनी सर्वानांच संभ्रमात टाकलं आहे.

First published:

Tags: Bollywood News, Disha patani, Tiger Shroff