Home /News /entertainment /

Tiger Shroff Birthday: टायगर श्रॉफचं मूळ नाव काय माहित आहे का? वाचा नाव बदलण्यामागची फिल्मी कहाणी

Tiger Shroff Birthday: टायगर श्रॉफचं मूळ नाव काय माहित आहे का? वाचा नाव बदलण्यामागची फिल्मी कहाणी

बुधवारी (2 मार्च 2022) टायगर त्याचा 31 वा वाढदिवस साजरा (Tiger Shroff Birthday) करत आहे. जगभरातल्या त्याच्या फॅन्सकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान जाणून घेऊया 'टायगर' या नावामागे काय मजेदार किस्सा आहे.

मुंबई, 02 मार्च: बॉलिवूडमध्ये सगळ्यांत फिट अभिनेत्यांमध्ये सर्वात वर नाव असलेला अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ (Tiger Shroff Fitness). टायगरच्या फिटनेस आणि लुक्समुळे तो लाखो तरुणींच्या हृदयाची धडकन तर आहेच पण त्याच्या फॅन्समध्ये तरुण आणि बच्चे कंपनीची संख्याही मोठी आहे. बुधवारी (2 मार्च 2022) टायगर त्याचा 31 वा वाढदिवस साजरा (Tiger Shroff Birthday) करत आहे. जगभरातल्या त्याच्या फॅन्सकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान जाणून घेऊया 'टायगर' या नावामागे काय मजेदार किस्सा आहे. टायगर त्याच्या वडिलांप्रमाणेच बॉलिवूडमध्ये अभिनयातच करिअर करेल असं बहुतेकांना वाटत होतं. पण आश्चर्य म्हणजे सुरुवातीला त्याला यात काहीही रस नव्हता. उलट त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं. 'मला खेळांची खूप आवड होती. फुटबॉल माझा सगळ्यात आवडता खेळ होता. पण अगदी लहान असतानाही माझ्यावर लक्ष ठेवलं जात आहे हे मला माहिती होतं. मी कधीतरी बॉलिवूडमध्ये दिसेनच याबद्दल माझ्या वडिलांच्या मित्रांना खात्री होती,' असंही टायगरनं सांगितलं. हे वाचा-'मी पाहिलेला आतापर्यंतचा Best सिनेमा', Jhund पाहून आमिरच्या डोळ्यात अश्रू अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackey Shroff) आणि आयेशा श्रॉफ यांचा मुलगा टायगरनं आपल्या नावाची वेगळी ओळख बॉलिवूडमध्ये निर्माण केली असली तरी टायगर हे काही त्याचं खरं नाव नाही. त्याच्या जन्माच्या वेळेस त्याचं नाव जॅकी आणि आयेशानं जय हेमंत श्रॉफ असं ठेवलं होतं. पण त्यानं फिल्म इंडस्ट्रीत टायगर या नावाने पदार्पण केलं. टायगर त्याचे फायटिंग सीन्स आणि त्याचं नृत्यकौशल्य यासाठी ओळखला जातो. पण बॉलिवूडमध्ये आपल्याला जयऐवजी अगदी वेगळ्या नावानं ओळखलं जावं अशी त्याची इच्छा होती, असं त्यानं एका HT ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. टायगरला लहानपणी माणसांना चावण्याची सवय होती. त्याच्या याच सवयीमुळे लोक त्याची तुलना टायगर म्हणजे वाघाशी करु लागले. 'लहानपणी माझ्या आसपास असलेल्या अगदी प्रत्येक व्यक्तीला मी चावायचो,' असं त्यानं या मुलाखतीत सांगितलं. त्याचे शिक्षकही त्याच्या या सवयीचे बळी ठरले होते. 'मी माझ्या शिक्षकांनाही चावलो होतो आणि त्याबद्दल मला शिक्षाही झाली होती,' अशी आठवणही त्यांनं सांगितली. 2014 मध्ये त्यानं नागपूरच्या ली या वाघिणीला दत्तक घेतलं. त्याच्या ‘हिरोपंती’ या सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळेस त्यानं या वाघीणीला पहिल्यांदा पाहिलं होतं. त्यावेळेस त्यानं तिला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. हे वाचा-सलमान खानने सोनाक्षी सिन्हासोबत गुपचूप केलं लग्न! काय आहे VIRAL फोटोचं सत्य? हिरोपंती सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या टायगरनं अनेक हिट फिल्म्स दिल्या आहेत. बागी -1,2 आणि 3, वॉर, स्टुडंट ऑफ द इयर -2 असे त्याचे चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरलेत. आता त्याचा हिरोपंती- 2 हा सिनेमा 29 एप्रिल 22 रोजी रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. लुक्स, डान्स आणि फिटनेसमध्ये हिरो असलेल्या टायगरला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
First published:

Tags: Tiger Shroff

पुढील बातम्या