Home /News /entertainment /

'मी पाहिलेला आतापर्यंतचा Best सिनेमा', नागराजचा Jhund पाहून आमिर खानच्या डोळ्यातही अश्रू

'मी पाहिलेला आतापर्यंतचा Best सिनेमा', नागराजचा Jhund पाहून आमिर खानच्या डोळ्यातही अश्रू

नुकताच बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Amir Khan) याने हा चित्रपट पाहिला आणि तो भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी दिग्दर्शक नागराज मंजुळे उपस्थित होते.

मुंबई, 02 मार्च: नागराज मंजुळे (Nagraj Manjule latest movie) दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन स्टारर 'झुंड' (Jhund release date) हा चित्रपट 4 मार्च 22 रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत (Amitabh Bachchan starr Jhund) अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar), सोमनाथ अवघडे आणि अरबाज शेखसुद्धा आहेत. या चित्रपटात आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) देखील भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून त्याची चांगलीच चर्चा सुरू आहे. दरम्यान, नुकताच बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Amir Khan) याने हा चित्रपट पाहिला आणि तो भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी दिग्दर्शक नागराज मंजुळे उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर आमिर म्हणाला, 'माझ्याकडे या चित्रपटाविषयी बोलण्यासाठी शब्दच नाहीत. तुम्ही या चित्रपटात मुलांची इमोशन्स अगदी उत्तमरित्या मांडली आहेत. या मुलांनी तर खूप छान काम केलंय.'  हा चित्रपट बघताना आमिर खान भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. आमिर पुढे म्हणाला की, 'सिनेमा पाहिल्यानंतर शेवटी मी एका स्पिरिटने उठतो. हा सिनेमा त्यानंतर मला सोडू शकत नाही.' हे वाचा-Jhund पाहून आमिर खानने आकाश ठोसरला मारली कडकडून मिठी! म्हणाला... 'हा खूप उत्कृष्ट आणि युनिक चित्रपट आहे. चित्रपट वेळोवेळी एक वेगळाच अनुभव आणि आश्चर्याचा धक्का देतो. आम्ही गेल्या 20-30 वर्षांत जे शिकलोय, त्या पलीकडचा हा चित्रपट आहे,' अशा शब्दांत आमिरने दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि टीमचं कौतुक केलं. टी सिरीजने या आमिर खानच्या प्रतिक्रियेचा हा व्हिडीओ शेअर केलाय. यावेळी आमिरने टीममधील सर्व कलाकारांची भेट देखील घेतली आणि सर्वांना घरी आमंत्रित केलं. आमिर खान महानायक अमिताभ बच्चन यांचं कौतुक करताना म्हणतो की, 'बच्चन साहेबांनी काय अफलातून काम केलंय. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. या चित्रपटातील त्यांची ही भूमिका आणि काम सर्वोत्कृष्ट पैकी एक आहे.' हे वाचा-'Jhund' च्या टीममध्ये रंगला फुटबॉल सामना, आकाश ठोसरवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा दरम्यान, 'झुंड' हा फुटबॉलवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन एका फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. जे गरीब मुलांची फुटबॉल टीम (football team) तयार करतात. स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर आणि घटनांवर आधारित हा चित्रपट आहे. ज्यांनी फुटबॉलच्या माध्यमातून नागपूरच्या रस्त्यांवरील मुलांच्या आयुष्याला नवसंजीवनी दिली होती.
First published:

Tags: Aamir khan, Amitabh Bachchan, Bollywood, Nagraj manjule

पुढील बातम्या