Home /News /entertainment /

FACT CHECK: सलमान खानने सोनाक्षी सिन्हासोबत गुपचूप केलं लग्न! VIRAL फोटोमागील सत्य आलं समोर

FACT CHECK: सलमान खानने सोनाक्षी सिन्हासोबत गुपचूप केलं लग्न! VIRAL फोटोमागील सत्य आलं समोर

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खान (Salman Khan) मनोरंजनसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. तो सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतो. त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच चाहत्यांना त्याच्या पर्सनल लाईफमध्येही प्रचंड रुची असते.

पुढे वाचा ...
    मुंबई, 2 मार्च-  बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता सलमान खान   (Salman Khan)  मनोरंजनसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. तो सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतो. त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच चाहत्यांना त्याच्या पर्सनल लाईफमध्येही प्रचंड रुची असते. अभिनेत्याने पन्नाशी ओलांडली असली तरी अजूनही लग्न केलेलं नाहीय.त्यामुळे हा अभिनेता लग्न कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सलमान खान आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा   (Sonakshi Sinha)  एक फोटो व्हायरल होत आहे. आणि त्यासोबतच असं म्हटलं जात आहे की, सलमान खानने सोनाक्षीसोबत गुपचूप लग्न केलं आहे. आता या फोटो मागील सत्य समोर आलं आहे. अभिनेता सलमान खान हा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. 30 वर्षांहून अधिक काळातील त्याच्या चित्रपट कारकिर्दीत त्याने अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. सलमान खानने आत्तापर्यंत दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर पुरस्कारसोबत अनेक पुरस्कार पटकावले आहेत. बॉलिवूड दबंग सलमान खानची पर्सनल लाईफ सतत चर्चेत असते. अलीकडेच, सोनाक्षी सिन्हा आणि सलमान खानचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये सलमान खान सोनाक्षी सिन्हाच्या भांगेत कुंकू भरताना दिसत होता. त्यांनतर सलमानने सोनाक्षीसोबत गुपचूप लग्न केले अशी खळबळ सोशल मीडियावर उडाली होती. तुम्हीही असाच विचार करत असाल, तर थांबा… आता आम्ही तुम्हाला या व्हायरल फोटोमागील संपूर्ण सत्य सांगत आहोत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो आणि सलमान खान-सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या बातम्या खोट्या आहेत. फोटोशॉपने हा फोटो एडिट केला आहे. दोघांनी अजून कोणाशीही लग्न केलेले नाही. (हे वाचा:महेश मांजरेकरांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, अटक टळली, काय आहे नेमकं प्रकरण) एकीकडे सलमान खान स्वत:ला सिंगल असल्याचे सांगत आहे. परंतु तो अनेकदा त्याची मैत्रिण युलिया वंतूरसोबत दिसतो. त्यामुळे सलमान आणि युलिया रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, त्यांनी याप्रकरणी आतापर्यंत मौन बाळगले आहे.दुसरीकडे सोनाक्षीचे नाव झहीर इक्बालसोबत जोडले जात आहे.परंतु सोनाक्षीने या गोष्टीला नकार दिला आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Photo viral, Salman khan, Sonakshi sinha

    पुढील बातम्या