मुंबई, 26 सप्टेंबर : दोन वर्षाच्या लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा सण-उत्सव साजरा केला जात आहे. नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली असून सगळीकडे आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे. आजपासून नऊ दिवस महाशक्तीच्या उपासनेचा उत्सव सुरू झाला आहे. प्रत्येकासाठी ही नवरात्र खूप खास आहे. याचे कारणंही वेगवेगळी आहेत. अभिनेत्री रसिका सुनिलने नवरात्री स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिनं यंदाची नवरात्र तिच्यासाठी का खास आहे हे सांगितलं आहे. रसिकाने नुकतंच कमला मेहना ब्लाइंड स्कूल, दादर येथे हजेरी लावली. यावेळी रसिकाने 250 नेत्रहीन मुलींसोबत गरब्याचा आनंद लुटला आहे. याविषयी अभिनेत्री रसिका सुनीलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीये.पोस्ट शेअर तिनं लिहिलंय की, ‘ही नवरात्र खूप स्पेशल होती. नवरात्रच्या निमित्तानं मला या खूप गोड मुलींना भेटता आलं. त्यांची सुंदर शाळा बघता आली आणि त्यांत्या संयमी आणि प्रेमळ शिक्षकांना भेटले. दांडियाला सेलो टेप लावून स्पर्शाने ओळखून खालचा, वरचा भाग रंगवून या गोड मुली दांडिया बनवतात. या मुलींना अशाच युक्त्या वापरुन अनेक कला अवगत आहेत. त्यांच्या शिक्षकांचंही तेवढंच कौतुक’. हेही वाचा - Hemangi kavi : ‘दगड मातीच्या मूर्तींपेक्षा मी…’; ऐन नवरात्रीत हेमांगीच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष शेवटी रसिका म्हणाली, धाडस, आनंद, चिकाटी, प्रेम, हे सगळं या मुलींकडून आणि त्यांच्या शिक्षकांकडून शिकण्यासारखं आहे’. रसिकाच्या या पोस्टने सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. तिच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रियाही येताना दिसतायेत.
दरम्यान, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या मनात एक घर करुन गेली. या मालिकेप्रमाणेच मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनीलनं (Rasika Sunil)तिच्या अभियानं सगळ्यांची मनं जिंकली होती. खलनायिकेची भूमिका साकारूनसुद्धा तिला प्रेक्षकांकडून अफाट प्रेम मिळालं होतं. तिची ही भूमिका प्रचंड गाजली. तेव्हापासून ती सतत चर्चेत असते.