मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /दिलीप कुमार यांच्या निधनानंतर अशी झालीय सायरा बानोंची अवस्था, म्हणाल्या...

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर अशी झालीय सायरा बानोंची अवस्था, म्हणाल्या...

जवळच्या व्यक्तीचं आयुष्यातून अचानक निघून जाणं वेदनादायी असतं. ते दुःख स्वीकार करून त्यातून बाहेर पडायला बराच वेळ लागतो. अनेक जण अशा घटनांमुळे डिप्रेशनमध्ये (Depression) जातात, तर काही एकांतवासात जातात. बॉलिवूडच्या एक दिग्गज अभिनेत्री सध्या याच परिस्थितीतून जात आहेत.

पुढे वाचा ...

   मुंबई, 13 एप्रिल-   जवळच्या व्यक्तीचं आयुष्यातून अचानक निघून जाणं वेदनादायी असतं. ते दुःख स्वीकार करून त्यातून बाहेर पडायला बराच वेळ लागतो. अनेक जण अशा घटनांमुळे डिप्रेशनमध्ये (Depression) जातात, तर काही एकांतवासात जातात. बॉलिवूडच्या एक दिग्गज अभिनेत्री सध्या याच परिस्थितीतून जात आहेत. त्यांनी स्वतः त्यांच्या मनस्थितीबद्दल खुलासा केलाय. ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो (Saira Banu) या त्यांचे पती आणि दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या निधनाने खचल्या आहेत.

  ETimes शी बोलताना सायरा बानो म्हणाल्या की, 'मी खूप अस्वस्थ आहे, दिलीप कुमार साहेबांच्या निधनाने मी अस्वस्थ आहे, मी या दु:खातून बाहेर पडू शकत नाही. मी यातून कसं बाहेर पडू? दिलीप साहेब आजारी होते; पण मी त्यांच्यासोबत होते, आनंदी होते आणि सर्व काही ठीक होतं. मला दिलीप साहेबांसोबत घरी वेळ घालवायला आवडायचं. आता ते माझ्यासोबत नाहीत. जोपर्यंत माझा हा त्रास कमी होणार नाही, तोपर्यंत मी यातून बाहेर पडू शकणार नाही. किंबहूना मी घरातूनही बाहेर पडू शकणार नाही. माझी उद्विग्नता कमी होणार नाही. मला माझ्या आयुष्यात साहेबांची नितांत गरज आहे,' असं म्हणत सायरा बानो यांनी भावनांना मोकळी वाट करून दिली.

  सायरा बानोंनी कबूल केलं की, त्या लोकांमध्ये मिसळत नाहीत आणि फक्त त्यांच्या जवळच्या मित्रांच्या संपर्कात आहेत. पुढे कृतज्ञता व्यक्त करत त्या म्हणाल्या की, ‘मी स्वतःला भाग्यवान समजते की बरेच लोक माझी खूप काळजी करतात. परंतु, सध्या मी स्वतःला ध्यान आणि प्रार्थनेत व्यस्त ठेवत आहे. दिग्गज ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar Death) यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांच्या आणि विशेषत: त्यांची पत्नी सायरा बानो यांच्या हृदयात आणि आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दिलीप साहेब आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या मनात कायम राहतील. नवभारत डॉट कॉमने या संदर्भात वृत्त दिलंय.

  दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो या एकांतवासात गेल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून येत होत्या. त्या कोणाशी बोलत नाहीत, कोणाला भेटत नाहीत, असंही म्हटलं जात होतं. याबद्दल आता स्वतः सायरा बानो यांनी खुलासा केलाय.

  बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे 7 जुलै 2021 रोजी निधन झाले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचं निधन झालं होतं. सायरा बानो आणि दिलीप कुमार 56 वर्षं सोबत होते, असं म्हटलं जातं. सायरा बानो दिलीप कुमार यांची खूप काळजी घ्यायच्या. दिलीप कुमार यांच्यासोबत पत्नी म्हणून सायरा बानो शेवटच्या क्षणापर्यंत सावलीप्रमाणे राहिल्या.

  First published:

  Tags: Bollywood News, Dilip kumar, Entertainment