Home /News /entertainment /

ओळखा पाहू? बालपणी फ्रिजमध्ये बसून मस्ती करायचा हा प्रसिद्ध अभिनेता, फोटो होतोय व्हायरल

ओळखा पाहू? बालपणी फ्रिजमध्ये बसून मस्ती करायचा हा प्रसिद्ध अभिनेता, फोटो होतोय व्हायरल

या अभिनेत्याच्या फिल्मी करिअरवर नजर टाकली तर त्यानं अल्पावधीतच मोठं यश मिळवल्याचं दिसून येतं.

    नवी दिल्ली, 24 जून : अनेक बॉलिवूड सेलेब्रिटीज (Bollywood Celebrities) सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कनेक्टेड आहेत. खासगी जीवनातल्या गोष्टी, चित्रपटांची पोस्टर्स, प्रवासातल्या गमतीजमती आदी गोष्टी हे सेलेब्रिटीज फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसाठी शेअर करत असतात. सेलेब्रिटीजच्या बहुतांश पोस्ट्स, व्हिडिओज आणि फोटोज खूप व्हायरल होतात. अनेकदा विचित्र किंवा आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानं नेटिझन्स या सेलेब्रिटीजना ट्रोलही (Toll) करतात. बॉलिवूड अभिनेते, अभिनेत्री त्यांच्या बालपणीचे, शालेय किंवा कॉलेज जीवनातले फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करतात. अनेकदा फोटोतले सेलेब्रिटीज ओळखणंही चाहत्यांना कठीण जातं. या सर्व गोष्टी सांगण्याचं कारणही खास आहे. सध्या एका बॉलिवूड अभिनेत्याचा (Bollywood Actor) बालपणीचा फोटो (Childhood Photo) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो नेमका कोणाचा आहे, हे ओळखणं नेटिझन्सना अवघड जात आहे. हा फोटो बॉलिवूडमध्ये अल्पावधीत यशस्वी ठरलेल्या विकी कौशलचा (Vicky Kaushal) आहे. यापूर्वी विकी कौशलचे बालपणीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याविषयीची माहिती देणारं वृत्त `झी न्यूज हिंदी`ने प्रसिद्ध केलं आहे. सोशल मीडियावर सध्या एका लहान मुलाचा फ्रीजमध्ये (Fridge) बसलेला असतानाचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. हा फोटो नेमक्या कोणत्या अभिनेत्याचा आहे हे ओळखणं चाहत्यांसाठी कठीण बनलं आहे. अनेकांना ते ओळखता आलेलं नाही. हा लहान निरागस मुलगा म्हणजे आजचा बॉलिवूडमधला आघाडीचा अभिनेता विकी कौशल होय. लहानपणी तो किती खोडकर असावा, हे या फोटोतून दिसतं. फोटोत हा गोंडस मुलगा फ्रीजमध्ये अशा प्रकारे बसलेला दिसतो, की तो पाहून कोणालाही त्याला जवळ घ्यावंसं वाटेल. सोशल मीडियावर बालपणीचा फोटो शेअर केल्यानंतर विकी कौशल चर्चेत आला आहे. विकी कौशलच्या फिल्मी करिअरवर नजर टाकली तर त्यानं अल्पावधीतच मोठं यश मिळवल्याचं दिसून येतं. विकीनं `मसान` (Massan) या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. `उरी : द सर्जिकल स्ट्राइक` या चित्रपटामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. या चित्रपटाच्या यशानंतर विकीनं मागं वळून पाहिलं नाही. याशिवाय विकीनं सरदार उधम, राजी आणि संजू या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. दमदार अभिनयामुळे विकीनं आज बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. त्याच्यासोबत काम करायला मिळावं, अशी प्रत्येक अभिनेता, अभिनेत्रीची इच्छा आहे. विशेष म्हणजे विकी आता अमीर खान, सलमान खान आणि शाहरूख खान या तीन सुपरस्टार्सइतकं मानधन घेत आहे. त्याच्या आणि कतरिना कैफच्या लग्नाचीही खूप चर्चा झाली होती.

    First published:

    Tags: Bollywood News, Social media, Star celebraties, Vicky kaushal

    पुढील बातम्या