जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने घेतली गोल्डन बॉय नीरज चोप्राची भेट; म्हणाला...

'या' प्रसिद्ध अभिनेत्याने घेतली गोल्डन बॉय नीरज चोप्राची भेट; म्हणाला...

'या' प्रसिद्ध अभिनेत्याने घेतली गोल्डन बॉय नीरज चोप्राची भेट; म्हणाला...

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याने नीरजची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे तो नीरजचा आवडता अभिनेता आहे. काही दिसांपूर्वीच नीरजने त्याच्या आवडत्या अभिनेत्याविषयी सांगितल होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 25 ऑगस्ट :  काही दिवसांपूर्वीच टोकियो ऑलिम्पिक (Tokiyo Olympics) स्पर्धा संपल्या आहेत. भारताच्या पारड्यात सुवर्ण पदक आणणारा गोल्डन बॉय नीरज चोप्रा (Neeraj Chopra) तेव्हापासून फारच चर्चेत आहे. निरनिराळया ठिकाणी त्याचे सत्कार समारंभ पार पडत आहेत. अनेक व्यक्ती त्याची भेट देखील घेत आहेत. तर आता बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याने नीरजची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे तो नीरजचा आवडता अभिनेता आहे. काही दिवसांपूर्वीच नीरजने त्याच्या आवडत्या अभिनेत्याविषयी सांगितल होतं. अभिनेता रणदीप हुड्डाने (Randeep Hooda) नीरजची भेट घेतली आहे. रणदीप हा नीरज चा आवडता अभिनेता आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितल होत. काही दिवसांपूर्वीच रणदीपचा वाढदिवस होता त्यावेळी त्याने ही मुलाखत त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली होती. व नीरजला धन्यवाद देखील केलं होतं. तर आता दोघेही प्रत्यक्षात एकमेकांना भेटले आहेत.

Bigg Boss OTT Day 17: बिग बॉसच्या घरात नवा ट्वीस्ट; राकेशने शमिता शेट्टीला दिला मॉर्निंग Kiss

रणदीप देखील नीरज ला भेटून फारच आनंदी झाला आहे. सोशल मीडियावर त्याने दोघांचा ही फोटो शेअर केला आहे.  याशिवाय त्याने हरियानवी भाषेत कॅप्शन देखील लिहिलं आहे. तो लिहितो, ‘कसुत्ता मानस !!…नयुए धूम्मा सा ठाणदा रह 😎👊🏽👊🏽.’ यानंतर त्याने लिहिलं आहे. ‘एखादी व्यक्ती उंचावरून कुठे जाऊ शकते? खूपच कमी लोकांना या प्रश्नाला तोंड द्यावं लागतं तर फारच कमी लोकांना याचं उत्तर माहीत असतं. तुला भेटून मला आतून हे जाणवलं भावा, नीरज चोप्रा.’ अशी पोस्ट त्याने लिहिली आहे.

जाहिरात

दरम्यान काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते मधुर भंडारकर (Madhur Bhandarkar) यांनीही नीरजची दिल्लीत भेट घेतली होती.  त्यामुळे नीरजवर बायोपिक येणार का अशी चर्चा रंगली होती मात्र नीरजने सध्या आपल्याला त्यात रस नसल्याचं सांगितलं तसेच खेळावर आणखी लक्ष केंद्रित करायचं असल्याचंही म्हटलं होतं. भालाफेक स्पर्धेत नीरजला सुवर्ण पदक मिळालं आहे. अनेक वर्षांनंतर भारताला सुवर्ण पदकाचा सन्मान मिळाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातून नीरजचं कोडकौतुक होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात