मुंबई, 16 डिसेंबर- स्टार प्रवाह वहिनीवर सुरू झालेली ठिपक्यांची रांगोळी (Tipkyanchi Rangoli) या मालिका कमी वेळेत प्रेक्षकांची आवडती बनली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आता मालिका एका वेगळ्या वळणावर आहे. अशातच मालिकेत एक नवीन एंट्री होणार आहे.अभिनेत्री आणि प्रसिद्ध लेखिका (writer and actress Mugdha Godbole) मुग्धा गोडबोलेची मालिकेत एंट्री होणार आहे. अभिनेत्री आणि प्रसिद्ध लेखिका मुग्धा गोडबोले ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अपूर्वाच्या आईची भूमिका साकारणार आहे. एका पोर्टलने याबाबत वृत्त दिले आहे. मुग्धा गोडबोलेने चार दिवस सासूचे, एक निर्णय, दुसरी गोष्ट, कदाचित अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केले आहे. मुग्धाने हॅम्लेट या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका केली आहे. हे नाटक खूप लोकप्रिय ठरले होते. आता त्या या मालिकेत दिसणार असल्याचे समोर आले आहे. वाचा : अंकिता लोखंडेने विकीसोबत अंगठी शोधताना केलं असं काही, Video Viral या मालिकेतून ज्ञानदा रामतीर्थकर आणि चेतन वडनेरे मुख्य भूमिकेत आहेत. अपूर्वा आणि शशांक असं दोघांच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. या मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. ज्ञानदा आणि चेतन यांनी याआधी बऱ्याच मालिकांमधून लक्षवेधी भूमिका साकारली आहे. या मालिकेतील या दोघांची जोडी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी आहे. आता मालिकेतील या नवीन एंट्रीचा मालिकेवर काय परिणाम होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ही मालिका सध्या नव्या वळणावर आली आहे. या मालिकेचे लेखन अभिनेत्री मुग्धा गोडबोले करत आहे. मुग्धाने एका मुलाखतीत लेखनाबद्दल खंत व्यक्त केली होती. तिने म्हटले होते की, आम्हाला संवाद लेखनासाठी पुरेसा वेळ मिळत असला तरी एकूणच टीव्ही क्षेत्रात मालिकेच्या लेखनाला आजही पुरेसे महत्त्व दिले जात नाही.

)







