मुंबई, 15 डिसेंबर - अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओंनी सोशल मीडिया धुमाकूळ घातला आहे. 14 डिसेंबर रोजी अंकिता आणि विकीने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्नगाठ बांधली. यावेळी वधू रुपात अंकिता खूपच सुंदर दिसत होती, तर विकीही डॅशिंग दिसत होता. अंकिताने लग्नात परिधान केलेला लेहेंगा आणि विकीच्या शेरवानीचीही बरीच चर्चा झाली. अंकिताने तिच्या लग्नात खूप धमाल केली. त्यांच्या लग्नातील विधींचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये अंकिता मस्ती करताना दिसत आहे. अंकिता लोखंडे तिच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक होती. थाटामाटात लग्न करण्याची त्यांची इच्छा होती आणि ही इच्छा पूर्ण झाली. अंकिताच्या लग्नाच्या व्हिडिओंना सोशल मीडियावर मोठी पसंती मिळत आहे. तिचे चाहते अनेक मजेशील व्हिडिओ शेअर करत आहेत. एका फॅन पेजने अंकिताचा मस्ती करतानाचा व्हिडिओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिलंय की ‘एकदम कूल नवरी, अजितबात लाजत नाही’. वाचा : BREAKING : आलियाने तोडले कोरोनाचे नियम, दिल्लीतून मुंबईत येताच कारवाईची शक्यता व्हिडिओमध्ये पीच गोल्डन कलरची साडी परिधान केलेली अंकिता सर्व्हिस ट्रॉलीवर बसून हसताना दिसत आहे. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर ‘छोरी बडी ड्रामा क्वीन है’ हे गाणे वाजत आहे.
अंकिता लोखंडेच्या आणखी एका फॅन पेजने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन लग्नानंतर अंगठी शोधण्याची विधी करताना दिसत आहेत. या विधीमध्ये अंकिता आणि विकी एका भांड्यात हळदीचे पाणी आणि फुले यांच्यातील अंगठी शोधताना मजा करताना दिसत आहेत. नात्यातील स्त्रिया त्यांना खेळ भरवत आहेत. अंकिता हिरव्या बांगड्यांनी भरलेले हात घालून अंगठी शोधत असताना विकी तिचा हात धरून ती काढताना दिसतो.
अंकिता लोखंडेचा मेंदी सोहळाही चांगलाच गाजला. विकी जैनने तिला उचलून घेतले. विकी आणि अंकिता 2018 पासून एकमेकांना डेट करत होते. विकी हा व्यावसायिक आहे. लग्नापूर्वी अंकिताने अनेकदा विकीसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

)







