मुंबई, 27 फेब्रुवारी: अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ (Amitabh Bachchan KBC) हा गेम शो गेल्या अनेक वर्षांपासून लोकांचं मनोरंजन करतोय. त्याशिवाय अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्नही पूर्ण करतोय. जवळ जवळ दोन दशकांहून अधिक काळ हा शो छोट्या पडद्यावर सुरू आहे. करोडपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेकांप्रमाणेच या मराठी अभिनेत्रीच्या पतीनेही हे स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण केलं. होय. कौन बनेगा करोडपती या शोमध्ये हर्षवर्धन नवाथे (Harshvarshan Nawathe) यांनी 22 वर्षांपूर्वी भाग घेतला होता आणि या शोमध्ये एक कोटी रुपये जिंकणारे ते पहिले विजेते (First Winner of KBC) ठरले होते. हर्षवर्धन नवाथे हे मराठी अभिनेत्री सारिका नवाथे (Sarika Nawathe) यांचे पती आहेत. हर्षवर्धन नवाथे यांनी 2000 साली केबीसीमध्ये भाग घेतला होता. त्या वेळी ते एक कोटी रुपये जिंकले होते. मुंबईचे असलेले त्या वेळी हर्षवर्धन नवाथे 27 वर्षांचे होते आणि आयएएस ऑफिसर (IAS officer) होण्याचं स्वप्न पाहत होते. याचदरम्यान, त्यांनी केबीसीमध्ये भाग घेतला. केबीसी जिंकल्यानंतर सात वर्षांनी म्हणजेच 2007 साली अभिनेत्री सारिका यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. हे वाचा- देवमाणूस 2 मालिकेत नवीन एंट्री, सोनू आहे सोशल मीडिया स्टार सारिका आणि हर्षवर्धन याचं अरेंज मॅरेज झालं. त्या दोघांना दोन मुलं आहेत. हर्षवर्धन यांच्या आई-वडिलांनी सारिकाला पसंत केलं आणि या दोघांचं लग्न झालं. हर्षवर्धन नवाथे सध्या डच रिक्रूटमेंट कंपनीत चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.
सारिका नवाथे यांना तुम्ही स्टार प्रवाहवरच्या ‘ठिपक्याची रांगोळी’ मालिकेत बाबी आत्याच्या भूमिकेत पाहिलं असेल. याशिवाय त्यांनी ‘पहिली शेर दुसरी सव्वा शेर’ चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत काम केलं आहे. त्यांनी दूरदर्शनवरच्या ‘गुलाम ए मुस्तफा’ या हिंदी मालिकेत भूमिका साकारली होती. तसंच एक डाव संसाराचा, अजिंक्य या चित्रपटांतदेखील त्या झळकल्या होत्या. त्यांनी चाणक्य, जास्वंदी यांसारख्या नाटकांतही काम केलं असून त्यांनी आतापर्यंत अनेक छोट्या-मोठ्या जाहिरातींत काम केलं आहे.
सारिका यांनी कलर्स मराठीवरच्या ‘कुंकू टिकली आणि टॅट्टू’ मालिकेत विभा कुलकर्णी यांची भूमिका साकारली होती. ‘मोलकरीण बाई’ मालिकेतली त्यांची भूमिका लोकप्रिय ठरली होती. सारिका नवाथे या सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असतात. इन्स्टाग्रामवर पती आणि मुलांसोबतचे फोटो त्या शेअर करत असतात. सारिका यांचे इन्स्टाग्रामवर 19 हजार फॉलोअर्स आहेत. सारिका यांनी इन्स्टाग्रामवर देखील त्यांच्या केबीसी सेटवरील काही आठवणी शेअर केल्या आहेत.