‘तुझ्याशिवाय आयुष्य...’; सुशांतच्या आठवणीनं रिया चक्रवर्ती झाली व्याकूळ

रिया चक्रवर्तीनं सुशांत सिंग राजपूतच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्तानं शेअर केली खास पोस्ट, म्हणाली...

रिया चक्रवर्तीनं सुशांत सिंग राजपूतच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्तानं शेअर केली खास पोस्ट, म्हणाली...

  • Share this:
    मुंबई 14 जून: 14 जून 2020 रोजी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं (Sushant Singh Rajput) आत्महत्या केली होती. आज या धक्कादायक घटनेला एक वर्ष उलटून गेलं आहे. आज सुशांतची पहिली पुण्यतिथी आहे. या निमित्तानं देशभरातील चाहते आज पुन्हा एकदा सुशांतच्या आठवणीनं भावूक झाले. दरम्यान अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं (Rhea Chakraborty) देखील एका सोशल मीडिया पोस्टद्वारे सुशांतची आठवण काढली. रिया सुशांत मृत्यू प्रकरणात संशयीत आरोपी आहे. त्यामुळं तिची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. “तुझ्याशिवाय आयुष्य नाही... तू स्वत:सोबत आयुष्याचा अर्थ घेऊन गेलास. तूझ्या जाण्यामुळं निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरुन काढता येणार नाही. मला तुझी खूप आठवण येतेय. लोक म्हणतात वेळेसोबत जखमा भरतात. पण माझी वेळ तर तू होतास.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून रियानं सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. भाग्यश्री मोटेनं सांगितलं आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं गुपित; चाहत्यांना बसला धक्का
    वजनावरुन ट्रोल करणाऱ्यांना रिताशाचं प्रत्युत्तर; Bikini फोटो शेअर करत उडवली खळबळ सुशांतनं 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूला आज एक वर्ष उलटून गेलं आहे. मात्र मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हे प्रकरण दिवसेंदिवस आणखीनच गुंतत चाललं आहे. आधी मुंबई पोलीस, मग इन्कम टॅक्स, पुढे सीबीआय आणि आता NCB द्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती ही संशयीत आरोपी आहे. तिनं आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी सुशांतला ड्रग्स देऊन आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं असे आरोप तिच्यावर करण्यात आले आहेत. शिवाय ड्रग्ज प्रकरणी तिला अटकही करण्यात आली होती. गेल्या कित्येक महिन्यांपासून तिची चौकशी सुरु आहे. या चौकशीत तिनं अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नावं घेतली. सध्या तिनं केलेल्या दाव्यांची उलट तपासणी केली जात आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published: