मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Mega Blockbuster Trailer: ना चित्रपट, ना सिरिज, कपिल शर्मा-दीपिका पदुकोणच्या मेगा ब्लॉकबस्टरचं सत्य आलं समोर

Mega Blockbuster Trailer: ना चित्रपट, ना सिरिज, कपिल शर्मा-दीपिका पदुकोणच्या मेगा ब्लॉकबस्टरचं सत्य आलं समोर

 ‘मेगा ब्लॉकबस्टर’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तुम्ही विचारही केला नसेल असा धमाकरेदार ट्रेलर आहे. या ट्रेलरने सगळ्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 4 सप्टेंबर: गेल्या बऱ्याच दिवसांपासून ‘मेगा ब्लॉकबस्टर’ चित्रपटाची चर्चा पहायला मिळाली. ‘मेगा ब्लॉकबस्टर’ फर्स्ट लुक समोर आल्यापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. अशातच आता ‘मेगा ब्लॉकबस्टर’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तुम्ही विचारही केला नसेल असा धमाकरेदार ट्रेलर आहे. या ट्रेलरने सगळ्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला आहे.

कॉमेडियन कपिल शर्मा, क्रिकेटर सौरव गांगुली, रोहित शर्मा, अभिनेता रणवीर सिंग, अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि दीपिका पदुकोण यांनी सोशल मीडियावर 'मेगा ब्लॉकबस्टर'चे पोस्टर रिलीज केले होते. त्यामुळे हे सगळे स्टार्स एकत्र दिसणार म्हणून चाहते तर खूपच उत्साही होते. मात्र ‘मेगा ब्लॉकबस्टर’ ट्रेलर समोर आल्यावर तर चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. सगळ्याची अपेक्षा भंग झाली.

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

ट्रेलरवरुन समोर आलं आहे की, 'मेगा ब्लॉकबस्टर' हा चित्रपट नाही तर 'मिशो'ची प्रमोशनल कॅम्पेन आहे. जो एक मोठा सेल असणार आहे. याच कारणामुळे हे सर्व स्टार्स त्यांच्या चाहत्यांना चकमा देत होते. त्यांनी सगळ्याच प्रेक्षकांना गोंधळात टाकलं होतं. आता ट्रेलरवरुन हे उघड झालं की सगळे 'मिशो' अॅपच्या मेघा सेल साठी एकत्र आले होते.

हेही वाचा -  Bramhastra Advance Booking: रिलीजपूर्वीच Bramhastra ने कमावला इतक्या कोटींचा गल्ला

दरम्यान, ट्रेलरपूर्वी काहींना ही चित्रपट नसल्याचं समजलं होतं. सौरव गांगुलीने कंपनीने पाठवलेला मजकूर कॉपी करून त्याच्या पोस्टमध्ये टाकला होता, पण चूक लक्षात येताच त्याने पोस्ट डिलीट केली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नेटकऱ्यांनी स्क्रीन शॉट्स घेतले आणि अशा प्रकारे मेगा ब्लॉकबस्टर ही मीशोची जाहिरात मोहीम असल्याची आयडिया आली.

First published:

Tags: Bollywood, Deepika padukone, Kapil sharma, Ranvir singh, Rashmika mandanna, Rohit sharma