मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bramhastra Advance Booking: रिलीजपूर्वीच Bramhastra ने कमावला इतक्या कोटींचा गल्ला

Bramhastra Advance Booking: रिलीजपूर्वीच Bramhastra ने कमावला इतक्या कोटींचा गल्ला

 रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. 'ब्रह्मास्त्र'चे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून तिकिट बुकिंग वेगाने सुरु असल्याचं दिसत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 4 सप्टेंबर: दिग्दर्शक आयान मुखर्जीचा ड्रीम प्रोजेक्ट 'ब्रह्मास्त्र' लवकरच प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. 2014 मध्ये जाहीर झालेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे तशी प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची क्रेझ वाढत चालल्याचं दिसत आहे. 'ब्रह्मास्त्र'चे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून तिकिट बुकिंग वेगाने सुरु असल्याचं दिसत आहे.

'ब्रह्मास्त्र'च्या ट्रेलरमध्ये जबरदस्त स्पेशल इफेक्ट्स आणि एका दमदार कलाकारांनी बनवलेल्या कथेसह दाखवण्यात आले आहे. अतिमानवी शक्ती असलेल्या अशा कथानांचा जोरदार प्रेक्षकवर्ग आहे. 2 सप्टेंबर रोजी 'ब्रह्मास्त्र'चे अॅडव्हान्स बुकिंग IMAX 3D फॉरमॅटसह सुरु झालेले पहायला मिळाले. शनिवारी संध्याकाळी, चित्रपटाचे सामान्य 3D शो देखील बुकिंगसाठी खुले झाले आणि रविवारी सकाळपासून चित्रपटाचे 2D शो देखील बुक होणं सुरु झाले.

हेही वाचा - Jhalak Dikhhla Jaa: एका एपिसोडसाठी अमृता खानविलकरला मिळणार इतकी रक्कम,वाचा सर्वात जास्त मानधन कोणाला?

'ब्रह्मास्त्र'च्या 65,000 हून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. रिपोर्ट्समध्ये, अॅडव्हान्स बुकिंगमधून चित्रपटाचे एकूण कलेक्शन 2.55 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. 'ब्रह्मास्त्र'ने आतापर्यंत अॅडव्हान्स बुकिंगमधून 4 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

भारतात जवळपास 5000 स्क्रीन्सवर रिलीज होणारा 'ब्रह्मास्त्र' बॉलीवूडमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा रिलीज ठरणार असल्याचं चित्र आहे. भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटावर खूप मेहनत घेतली गेली असली तरी, बराच काळ पैसा पाण्यासारखा वाहून गेला आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.

दरम्यान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र'मध्ये अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood, Bollywood News, Ranbir kapoor, Upcoming movie