जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सुशांतच्या बहिणीने स्वत:च्या अक्षरात लिहिली भावुक पोस्ट, ‘या’ शब्दांनी चाहते गहिवरले  

सुशांतच्या बहिणीने स्वत:च्या अक्षरात लिहिली भावुक पोस्ट, ‘या’ शब्दांनी चाहते गहिवरले  

सुशांतच्या बहिणीने स्वत:च्या अक्षरात लिहिली भावुक पोस्ट, ‘या’ शब्दांनी चाहते गहिवरले  

तिच्या या भावुक शब्दांनी सुशांतचे चाहतेही त्याच्या आठवणीने गहिवरून गेले आहेत. त्यांनीही आपल्या लाडक्या अभिनेत्यावविषयी पुन्हा एकदा भावना व्यक्त केल्याआहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

 मुंबई 5 जुलै: सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर (Sushant Singh Rajput Suicide) अजुनही त्याचं कुटुंब त्या धक्क्यातून बाहेर येऊ शकलं नाही. सुशांत हा त्याच्या कुटुंबात सर्वांचा लाडका होता. त्याची बहिण श्वेता कीर्ति सिंह (Shweta Kirti Singh) आणि त्यात एक बॅण्डींग होतं. श्वेता सोशल मीडियावर आपल्या भावाविषयी कायम व्यक्त होत असते. त्यातून तिचं सुशांतवरचं प्रेम दिसून येतं. आपल्या लाडक्या भावाविषयी तिने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे. स्वत:च्या अक्षरात तिने लिहिलंय की प्रिय सुशांत, ‘तुच सगळ्यात पहिले आहेस’. Love You. तिच्या या पोस्टवर आता सुशांतचे चाहते व्यक्त  होत असून त्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. तिच्या या भावुक शब्दांनी सुशांतचे चाहतेही त्याच्या आठवणीने गहिवरून गेले आहेत.

News18

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्या प्रकरणाची त्याचे वडिल के.के सिंह (K.K singh) यांनी CBI चौकशीची मागणी केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. त्यांनी सुशांतच्या आत्महत्येबद्दल संशय व्यक्त करत अशी मागणी केल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र आता त्याबद्दल सुशांतच्या कुटुंबीयांनी मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणी कुठलाही संशय नसून कुटुंबीयांनी अशी कुठलीही मागणी केली नसल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सुशांतनं या कारणासाठी सोडला RAW सिनेमा, दिग्दर्शकांनाही बसला होता धक्का वडिल के.के सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून अशा प्रकारची मागणी केल्याचं वृत्तही काही माध्यमांनी दिलं होतं. मात्र अशा प्रकारचं कुठलंही ट्विटर हँडल त्यांचं वडिलांचं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. अष्टपैलू अभिनेता असलेल्या सुशांतने 14 जूनला त्याच्या बांद्रे इथल्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाची मुंबई पोलीस चौकशी करत आहेत. त्यात बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गजांची चौकशी झाली आहे. संपादन - अजय कौटिकवार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात