मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /दैव देतं अन् कर्म नेतं; KBC मधील करोडपती कसा झाला दिवाळखोर?

दैव देतं अन् कर्म नेतं; KBC मधील करोडपती कसा झाला दिवाळखोर?

रावाचा रंक झालेल्या केबीसी विजेता सुशील कुमारची दुर्दैवी कहाणी

रावाचा रंक झालेल्या केबीसी विजेता सुशील कुमारची दुर्दैवी कहाणी

रावाचा रंक झालेल्या केबीसी विजेता सुशील कुमारची दुर्दैवी कहाणी

  मुंबई 23 ऑगस्ट: ‘दैव देतं कर्म नेतं’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. अनेकदा नशिबानं एखाद्या व्यक्तीला अनपेक्षितपणे पैसा, प्रसिद्धी या गोष्टी किंवा हव्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी मिळतात; पण त्याचं कर्म या सगळ्या गोष्टी त्याच्यापासून हिरावून घेतं. याचंच एक ढळढळीत उदाहरण आहे केबीसी अर्थात ‘कौन बनेगा करोडपती’च्या (KBC) पाचव्या पर्वाचा विजेता बिहारचा (Bihar) सुशील कुमार (Sushil Kumar).

  येत्या 23 ऑगस्टपासून सोनी टीव्हीवर (Sony TV) केबीसीचे 13 वे पर्व सुरू होत आहे. बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सूत्रसंचलनात सुरू होणाऱ्या या शोबद्दल चर्चा रंगू लागली असून, जुन्या पर्वातील विजेत्यांच्या आठवणींना उजाळा मिळत आहे. यातूनच पाचव्या पर्वात पाच कोटी रुपये जिंकणाऱ्या सुशील कुमारची दुर्दैवी कहाणी समोर आली आहे.

  कोट्यवधी रुपये जिंकल्यानं या विजेत्यांच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होऊन ते अतिशय थाटात सुखी, आनंदी आयुष्य जगत असतील अशी लोकांची समजूत असते; पण प्रत्येकाच्या बाबतीत असं घडत नाही. अनेकदा पैसा आला की माणूस वाहवत जातो आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. तसंच काहीसं सुशील कुमारच्या आयुष्यात घडलं आहे.

  पारंपारिक पोलक्याला ग्लॅमरस टच; पाहा रुपाली भोसलेचे Classic Photo

  एनडीएने दिलेल्या वृत्तानुसार सुशील कुमार यानं फेसबुकवर स्वतःच आपल्या आयुष्याची परवड मांडली आहे. 2015-16 मध्ये केबीसीच्या पाचव्या पर्वात बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सोबत हॉटसीटवर बसून हा गेम यशस्वीपणे पूर्ण करत सुशील कुमारनं पाच कोटी रुपये जिंकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याच्या हुशारीचं सर्वत्र कौतुक होत होतं. एका रात्रीत सुशील कुमार बिहारमधील सेलेब्रिटी (Celebrity) बनला. तो इतका प्रसिद्ध झाला की, बिहारच नव्हे तर बाहेरच्या राज्यांमधूनही त्याला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं जाऊ लागलं. त्याचे सत्कार समारंभ होऊ लागले. महिन्यातले 10 ते 15 दिवस त्याचे अशा कार्यक्रमामध्ये जाऊ लागले. माध्यमांनी त्याला डोक्यावर घेतलं.

  महेश मांजरेकरांना Bladder Cancer; ऑपरेशननंतर समोर आली मोठी अपडेट

  स्थानिक पेपर्स, चॅनेल्स त्याच्या मुलाखती छापू लागले. यापूर्वी कोणालाही माहित नसणारा, सुशील कुमार देशभरात प्रसिद्ध झाला. अशा प्रसिद्धीचा अनुभव नसणारा सुशील कुमार या कौतुकाच्या लाटेवर स्वार होऊन भरकटू लागला. माध्यमांशी काय बोलावं, याचा अनुभव नसल्यानं त्यानं स्वतःचा बिझनेस आहे, असं सांगायला सुरुवात केली.

  बिझनेस करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्याला अपयश आलं. लोक त्याची स्तुती करून त्याच्याकडून पैसा लुबाडू लागले. दानधर्माच्या नावाखाली अनेकांनी त्याची फसवणूक केली. लोकांची पारख करण्यात तो चुकत असल्याबद्दल आणि अशाप्रकारे पैसा उधळण्यावरून त्याचे आणि त्याच्या पत्नीचे वाद (Clashes with Wife) होऊ लागले. याचदरम्यानं एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे एका मित्राच्या सहायानं त्यानं दिल्लीत कार्सचा व्यवसाय सुरू केला. या निमित्ताने त्याचं दिल्लीत (Delhi) येणेजाणे वाढलं, आणि त्याची जामिया मिलीयामध्ये मीडियाचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या तसंच आयआयएमसी आणि जेएनयु विद्यापीठात शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांची तसंच रंगभूमी कलाकारांशी ओळख झाली. त्यांच्या संगतीत त्यानं दिवसचे दिवस चित्रपट पाहण्यात घालवण्यास सुरुवात केली. माध्यमांपासून दूर रहायला सुरुवात केली. दारू सिगारेटच व्यसनही जडलं. याच दरम्यान, एकदा ‘प्यासा’ चित्रपट पाहत असतानाच त्याची पत्नी त्याला असे सारखे चित्रपट पाहण्यावरून ओरडू लागली. त्यामुळे वैतागून सुशील कुमार घराबाहेर पडला.

  त्याचवेळी एका पत्रकाराचा (Journalist) त्याला फोन आला. त्यावेळी सुशील कुमारनं त्याला आपल्याकडचे सर्व पैसे संपले असून, आपण दोन गायी घेऊन दूधविक्रीचा धंदा करत असल्याचं सांगितलं. ही बातमी छापून आली आणि सुशील कुमार भोवती जमलेले खोट्या मित्रांचे जाळे दूर झाले. सर्वजण त्याच्यापासून दूर राहू लागले. त्याला कार्यक्रमाला बोलावणे बंद झालं, त्यामुळं पुढची वाटचाल ठरवण्यासाठी विचार करायला वेळ मिळाला. या काळात चित्रपटांचे वेड लागल्यानं त्यानं दिग्दर्शक (Film Director) होण्याचं ठरवलं. त्याचदरम्यान, पत्नीशी जोरदार वाद झाल्यानं ती माहेरी निघून गेली आणि तिनं घटस्फोटाची मागणी केली. मग मात्र त्याचे डोळे खाड्कन उघडले. आपलं लग्न वाचवायचं असेल तर आपण काहीतरी केलं पाहिजे याची त्याला जाणीव झाली आणि एका निर्मात्या मित्राच्या सल्ल्यावरून त्यानं आधी या क्षेत्राचा अनुभव घेण्याचं ठरवलं. काही दिवस टीव्ही, मग नंतर एका मोठ्या चित्रपट निर्मात्या कंपनीत काम केलं. नंतर मुंबई (Mumbai) गाठली. इथं सहा महिने एका मित्राच्या घरी राहून चित्रपट पाहणे, पुस्तके वाचण्यात वेळ घालवला. याच काळात त्याला सिगारेट, दारूचे व्यसनही जडले होते, दिवसाला सिगारेटचे एक पाकीट तो संपवत असे. या काळात त्यानं तीन चित्रपट कथा लिहिल्या त्यासाठी त्याला केवळ 20 हजार रुपये मिळाले.

  अखेर वास्तवाची जाणीव झालेल्या सुशील कुमारनं स्वतःच परीक्षण केलं आणि अखेर मुंबईहून आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला. त्यानं शिक्षक होण्याचं ठरवलं. सिगारेट ओढणं सोडून दिलं. आता तो पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करत असून त्यात त्याला आनंद मिळत आहे. त्याचं आयुष्य सावरलं आहे. सुशील कुमारची ही कहाणी अनेक विजेत्यासाठी एक धडा ठरणारी आहे.

  First published:
  top videos

   Tags: Amitabh Bachchan, KBC