आई कुठे काय करते या मालिकेतून प्रसिद्ध झालेली रुपाली भोसले छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. या मालिकेतील तिची ‘संजना’ ही व्यक्तिरेखा सर्वांच्याच पसंतीस उतरली आहे. रुपाली भोसले मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बोल्ड आणि स्टाईलिश अभिनेत्री समजली जाते. अलिकडेच तिने काही पारंपारिक वेशातील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.