मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कोरोनामध्ये सर्वांना मदत करणाऱ्या सोनू सूदने 'हे' काय केलं? रेल्वे विभागाने झापलं

कोरोनामध्ये सर्वांना मदत करणाऱ्या सोनू सूदने 'हे' काय केलं? रेल्वे विभागाने झापलं

सोनू सूद

सोनू सूद

कोविड लॉकडाउनमध्ये अभिनेता सोनू सूदला प्रचंड लोकप्रियता मिळाली. महामारीच्या काळात हजारो गरजूंसाठी तो एखाद्या देवदूतासारखा मदतीला धावून आला होता. त्याने देशातल्या आणि देशाबाहेर अडकलेल्या भारतीयांना शक्य ती सर्व मदत केली.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Maharashtra, India

  मुंबई,5 जानेवारी-  कोविड लॉकडाउनमध्ये अभिनेता सोनू सूदला प्रचंड लोकप्रियता मिळाली. महामारीच्या काळात हजारो गरजूंसाठी तो एखाद्या देवदूतासारखा मदतीला धावून आला होता. त्याने देशातल्या आणि देशाबाहेर अडकलेल्या भारतीयांना शक्य ती सर्व मदत केली. त्यामुळे अनेकांनी त्याला आपलं प्रेरणास्थान मानण्यास सुरुवात केली; पण आता सोनूला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. एवढंच नाही, तर भारतीय रेल्वेनेदेखील त्याला आपली वर्तणूक सुधारण्याची विनंती केली आहे. हे प्रकरण एवढं पुढे गेलं आहे, की सोनूला जाहीरपणे माफी मागावी लागली आहे. सोनू सूदसारख्या शिस्तप्रिय व्यक्तीकडून कोणती चूक झाली, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल.

  काय आहे प्रकरण?

  सोनू सूद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. तो सातत्यानं आपले व्हिडिओ आणि फोटोज पोस्ट करतो. डिसेंबर 2022मध्ये सोनूने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ क्लिप पोस्ट केली होती. त्यामध्ये तो धावत्या ट्रेनच्या दारात बसलेला दिसत आहे. सोनूनं ट्रेनच्या दरवाज्याचं हँडल धरलं आहे आणि चालत्या ट्रेनच्या दारात उभा राहून तो हवेचा आनंद लुटताना दिसत आहे. हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना आणि काही युझर्सना आवडला नाही. अनेकांनी सोनूला बेजबाबदार म्हटलं आहे. नेटकरी म्हणाले, "तू चाहत्यांना कसला संदेश देत आहेस. हे चुकीचं आहे. कृपया असं करू नको."

  (हे वाचा:  Pathaan: 'पठाण'विरोधात बजरंग दल आक्रमक; मॉलमध्ये तोडफोड करत शाहरूखचं पोस्टर फाडलं)

  रेल्वेनं केली कानउघडणी

  उत्तर रेल्वे विभागानं हा व्हिडिओ बघून बुधवारी (4 जानेवारी) सोनू सूदला ट्रेनच्या दरवाज्यात बसून प्रवास केल्याबद्दल फटकारलं आहे. असं करणं 'धोकादायक' असल्याचं सांगितलं आहे. भारतातल्या लोकांसाठी तो एक आदर्श असल्याने त्याच्या व्हिडिओमुळे देशाला चुकीचा संदेश मिळेल, असं रेल्वेनं म्हटलं आहे. सोनूला टॅग करत उत्तर रेल्वेनं ट्विट केलं आहे, "प्रिय, @SonuSood, देश आणि जगभरातल्या लाखो जणांसाठी तू आदर्श आहेस. रेल्वेच्या दरवाज्यात बसून प्रवास करणं धोकादायक आहे. अशा प्रकारचा व्हिडिओ चाहत्यांना चुकीचा संदेश देऊ शकतो. कृपया असं करू नका! सुरळीत आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घ्यावा."

  सोनूनं मागितली माफी

  प्रकरण चिघळत असल्याचं पाहून सोनू सूदनं तातडीने माफी मागितली आहे. "मी माफी मागतो. लाखो गरीब नागरिकांना ट्रेनच्या दरवाज्यात बसून प्रवास करावा लागतो.

  त्यांना कसं वाटत असेल,हे पाहण्यासाठी मी तिथे बसून प्रवास करत होतो. मला धोक्याची जाणीव करून दिल्याबद्दल आणि देशाची रेल्वे व्यवस्था सुधारण्याच्या प्रयत्नांबद्दल धन्यवाद," असं ट्विट सोनूनं केलं आहे.

  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Sonu Sood