जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / The Kerala Story : 'या' कारणामुळे 'द केरला स्टोरी' ला OTT वर मिळत नाहीये कोणी वाली! समोर आलं सत्य

The Kerala Story : 'या' कारणामुळे 'द केरला स्टोरी' ला OTT वर मिळत नाहीये कोणी वाली! समोर आलं सत्य

'द केरला स्टोरी'

'द केरला स्टोरी'

अवघ्या 15-20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने 300 कोटींहून अधिक कमाई केली असून आता नजर ओटीटीवर आहे. मात्र आता हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार याच्या प्रतीक्षेत प्रेक्षक असताना मोठी बातमी समोर येत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 जून :  सुदीप्तो सेनच्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने थिएटरमध्ये बरीच कमाई केली होती. हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित झाला, चित्रपटाने आतापर्यंत भारतात 241.74 कोटी कमाई केली आहे आणि जगभरात 302 कोटींची कमाई केली आहे. धक्कादायक बातमी म्हणजे ज्या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले, पण त्याला आता OTT वर कोणीही खरेदीदार मिळत नाहीये अशी माहिती आहे. त्याच कारणही समोर आलं आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या. ‘द केरळ स्टोरी’चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर काही लोकांनी याला प्रोपगंडा फिल्म म्हटले आहे. मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटावर अनेक राज्यात बंदी घातली असली तरी त्याने चित्रपटगृहावर बराच काळ अधिराज्य गाजवले. अवघ्या 15-20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 300 कोटींहून अधिक कमाई केली असून आता नजर ओटीटीवर आहे. मात्र आता हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार याच्या प्रतीक्षेत प्रेक्षक असताना मोठी बातमी समोर येत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

आता हा चित्रपट रिलीजसाठी सॅटेलाइट आणि डिजिटल पार्टनर शोधत आहे. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक सुदीप्तो सेन हे सांगत होते की, त्यांना या चित्रपटासाठी कोणतीही चांगली ऑफर मिळाली नाही. चित्रपट निर्मात्याने बॉलिवूडवर आरोप करत असेही म्हटले होते की, फिल्म इंडस्ट्री त्यांना शिक्षा करण्यासाठी गँग करत आहे.’ पण सत्य यापेक्षा काही वेगळंच आहे. Bastar: ‘एक दडलेलं सत्य…’ ‘द केरला स्टोरी’ च्या यशानंतर विपुल शहा आणि सुदिप्तो सेन घेऊन येतायत ‘बस्तर’! काही रिपोर्टनुसार  या चित्रपटाचे निर्माते मोठ्या रकमेची मागणी करत आहेत माहितीनुसार चित्रपटाचे निर्माते याच्या ओटीटी प्रदर्शनासाठी खूप जास्त रक्कम मागत असल्याचं स्पष्ट झालं आहे. चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मकडे 70 ते 100 कोटींची मागणी केली आहे. कोणताही ओटीटी प्लॅटफॉर्म एवढी मोठी रक्कम देण्यास तयार नसल्याने हा चित्रपट ओटीटीवर येत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे सुदीप्तो सेन यांचे वक्तव्य म्हणजे व्हिक्टिम कार्ड खेळून सहानुभूती मिळवण्याचा एक प्रकार आहे. आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे की, आधी कोण झुकते, ओटीटी प्लेयर्स की ‘द केरळ स्टोरी’चे निर्माते? आता या दोन्ही बातम्यांमध्ये सत्य काय आहे, हे माहीत नाही, पण आता हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, ‘द केरला स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. बंगालपासून तमिळनाडूपर्यंत काही मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाला बंदीचा सामना करावा लागला. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटामध्ये फातिमा बी म्हणजेच शालिनी उन्नीकृष्णन आणि इतर तीन मुलींची कहाणी दाखवण्यात आली आहे. या तिन्ही मुलींचं कसं ब्रेनवॉश करून त्यांना आयएसआयएस या दहशतवादी संघटनेत भरती करण्यात आलं, हे या चित्रपटात दाखवलं गेलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात