या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विवेक अग्निहोत्री आणि कंगना रणौत यांची बाँडिंग चांगली आहे, दोघांची आयडियोलॉजी देखील सारखीच आहे. या दोघांमधील बातचीत प्राथमिक टप्प्यात असून सर्व काही व्यवस्थित झाल्यास अधिकृत घोषणाही केली जाईल. या दोघांच्या काहीच मीटिंग्स झाल्या आहेत. हे वाचा-The Kashmir Files मध्ये शारदा पंडित साकारणारी भाषा सुंबली आहे तरी कोण? द काश्मीर फाइल्स हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. बॉलिवूड बिझनेस अनालिस्ट तरन आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, द कश्मीर फाइल्स प्रदर्शनानंतर आठव्या दिवशी देशभरात 4000 स्क्रीन्सवर दाखवण्यात येत आहे, पहिल्या दिवशी या सिनेमाला 630+ स्क्रीन मिळाले होते. ही वाढ लक्षणीय आहे. दरम्यान द कश्मीर फाइल्सने पहिल्याच आठवड्यात 97.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे, या सिनेमाने नवा रेकॉर्ड केला आहे. तरन आदर्श यांनी केलेल्या पोस्टनुसार कोणत्याही मिड-रेंज हिंदी सिनेमाने अशाप्रकारचा ट्रेड कधीच पाहिला नव्हता. या सिनेमाचे बुकिंग्स रॉकिंग असल्याचेही ते म्हणाले.View this post on Instagram
दरम्यान अभिनेत्री कंगना रणौत हिने देखील विवेक अग्निहोत्रींच्या द कश्मीर फाइल्सचे कौतुक करत बॉलिवूडकरांवर टीका केली होती. तिने असं म्हटलं होतं की, 'सिनेमाच्या टीमचे खूप अभिनंदन. त्यांनी मिळून संपूर्ण चित्रपटसृष्टीने केलेली पापे धुवून काढली आहेत. बॉलीवूडची पापे धुवून काढली आहेत. एवढा चांगला चित्रपट बनला आहे आणि हा चित्रपट कौतुक करण्याजोगाच आहे, असं असताना इंडस्ट्रीतील लोक आपल्या बिळात उंदरांसारखे लपले आहेत त्यांनी बाहेर येऊन या चित्रपटाचे प्रमोशन करावे. ते केवळ बकवास चित्रपटांना प्रोत्साहन देतात.'View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.