मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

The Kashmir Files मध्ये शारदा पंडित साकारणारी भाषा सुंबली आहे तरी कोण? काय आहे तिचं काश्मीर कनेक्शन?

The Kashmir Files मध्ये शारदा पंडित साकारणारी भाषा सुंबली आहे तरी कोण? काय आहे तिचं काश्मीर कनेक्शन?

भाषा सुंबली (Bhasha Sumbli) या अभिनेत्रीनं 'द कश्मीर फाइल्स'मध्ये शारदा पंडितची (Sharda Pandit) भूमिका साकारली आहे.

भाषा सुंबली (Bhasha Sumbli) या अभिनेत्रीनं 'द कश्मीर फाइल्स'मध्ये शारदा पंडितची (Sharda Pandit) भूमिका साकारली आहे.

भाषा सुंबली (Bhasha Sumbli) या अभिनेत्रीनं 'द कश्मीर फाइल्स'मध्ये शारदा पंडितची (Sharda Pandit) भूमिका साकारली आहे.

     मुंबई, 17 मार्च-   विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचा प्रतिसाद पाहून अनेक राज्यांनी तो टॅक्स फ्रीदेखील (Tax Free) केला आहे. या चित्रपटात 1990 मध्ये काश्मीरमध्ये झालेला नरसंहार आणि काश्मिरी पंडितांवर (Kashmiri Pandits) झालेल्या अत्याचारांचं हृदयद्रावक चित्रीकरण दाखवण्यात आलं आहे. 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना हादरवून सोडणारी आहे. सोशल मीडिया व पब्लिक प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचं सातत्यानं कौतुक होत आहे. द काश्मीर फाइल्समध्ये अनुपम खेर (Anupam Kher), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty), दर्शन कुमार, मृणाल कुलकर्णी, पल्लवी जोशी, पुनीत इस्सार अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. या कसलेल्या कलाकारांसोबत आणखी एका अभिनेत्रीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आजपर्यंत अनेक टीव्ही सीरियल्समध्ये काम केलेल्या भाषा सुंबली (Bhasha Sumbli) या अभिनेत्रीनं 'द कश्मीर फाइल्स'मध्ये शारदा पंडितची (Sharda Pandit) दमदार भूमिका साकारली आहे. संपूर्ण कथेच्यादृष्टीनं भाषाची भूमिका फारच महत्त्वाची आहे. 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटात 1990 मध्ये काश्मिरात झालेला नरसंहार दाखवण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांच्या कुंटुंबांना बंदुकीच्या गोळ्या घालून ठार मारल्याचं चित्रीकरण या चित्रपटात आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांनी आपल्या भूमिकांमध्ये जीव ओतून काम केलेलं आहे. मात्र, त्यापैकी भाषा सुंबलीचं काश्मीरसोबत खरंखुरं नातं आहे. कारण, ती मूळची काश्मीरची आहे. ज्यांना आपलं घरदार सोडून निर्वासित छावण्यांमध्ये रहावं लागलं अशा कुटुंबांत भाषाचा जन्म झालेला आहे. चित्रपटात जो जगण्याचा संघर्ष दाखवण्यात आला त्याचा प्रत्यक्ष अनुभव तिच्या कुटुंबानं घेतलेला आहे. काश्मीरमधील अन्याय-अत्याचाराच्या गोष्टी ऐकतच भाषा लहानाची मोठी झाली. तिला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. त्यामुळे तिनं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून (NSD) अभिनयाचं (Acting) शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आणि अभिनय कौशल्यातील बारकावे शिकून घेतले.
    हरियाणवी चित्रपट अभिनेते दिवंगत ज्ञानचंद सोनी (Gyanchand Soni) यांचा धाकटा मुलगा सुनील सोनी (Sunil Soni) यांच्याशी भाषाचं लग्न झालेलं आहे. तिनं टीव्ही सीरियल्सच्या माध्यमातून आपल्या अॅक्टिंग करियरची सुरुवात केली. दूरदर्शनवरील 'एक था रस्टी' (Ek Tha Rusty) ही तिची पहिली टीव्ही सीरियल होती. गेल्यावर्षी तिनं श्वेता तिवारीच्या 'मेरे डॅड की दुल्हन' या सीरियलमध्येही काम केलेलं आहे. भाषा सुंबलीला केवळ अभिनयातच नाही तर दिग्दर्शनातही रस आहे. मेघना गुलजारच्या 'छपाक' (Chhapaak) या चित्रपटाची असिस्टिंट डिरेक्टर (Assistant Director) म्हणून तिनं काम केलेलं आहे. शिवाय याच चित्रपटात ती व्हिलनच्या बहिणीच्या रोलमध्येही दिसली होती. 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' आणि 'सबसे बडा आर्टिस्ट' या टीव्ही रिअॅलिटी शोंच डिरेक्शन भाषानं केलेलं आहे. (हे वाचा:द कश्मीर फाइल्स या लिंकवर फ्रीमध्ये', असा SMS आला आहे? बँक खातं होईल रिकामं) आता 'द कश्मीर फाइल्स'मधील भूमिकेसाठी तिला प्रेक्षकांचं ज्या प्रमाणात प्रेम मिळत आहे, ते यापूर्वी कधीही मिळालं नव्हतं. भाषानं साकारलेलं शारदा पंडितचं पात्र लोकांच्या काळजाला भिडलं आहे. चित्रपटात शारदासोबत झालेला अन्याय-अत्याचार मन हादरवून टाकणारा आहे. या चित्रपटात भाषाला मोजकेच डायलॉग मिळालेले आहेत, बाकी तिनं आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांना आपली स्तुती करण्यास भाग पाडलं आहे. प्रेक्षक आणि चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळं भाषा सध्या खूप आनंदात आहे.
    First published:

    Tags: Bollywood, Entertainment, Jammu and kashmir, New release

    पुढील बातम्या